Wednesday, 10 May 2017

भावतरंग- स्वत्व दाहक असतं

            आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःच स्वतःच्या अंतरंगाचं अलिप्ततेनं निरीक्षण करणं होय.
अंतरंगाचे रंग स्वतःलाच कळतात.आतल्या ऊर्मी स्वतःलाच जाणवतात.बहिर्वर्तनात वेगळं दिसू शकतं.निरीक्षणातून जे जाणवतं ते सत्य असतं. त्यापासून पलायन करता येत नाही.
               आसक्ती वाढतच जाते.तिला अंत नाही.आसक्तीतून अपेक्षा,अभिलाषा,आकांक्षा,
मोह इत्यादींचा जन्म होतो.
                  माणूस मात्र आसक्त नसल्याचा आव आणतो .तो खोटा असतो.
                  अंतर्मनाचा शोध ज्याचा त्यानेच  घ्यायचा असतो.परंतु माणूस ते टाळतो.त्यातून
स्वतःला अभिप्रेत नसलेलं स्वतःचं रूप डोळ्यासमोर येण्याचा येण्याचा संभव असतो.तिकडे
लक्ष जाऊ नये म्हणून इतर गोष्टीत स्वतःला गुंतवून घ्यावे लागते.
                     कुणी वाचनात मग्न तर कुणी लेखनात,कुणी मनोरंजनात तर कुणी व्यसनात,
कुणी नाच गाण्यात तर कुणी नाटक तमाशात,स्वतःला विसरायची हाव.
                       ज्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे ज्याने त्याने स्वतः ठरवलेल्या मार्गाने वाटचाल होते.
कुणी दारु पिऊन स्वतःची स्वतःला होणारी बोच विसरू पाहातो तर कुणी वेश्येच्या पायी वा
तिच्या मिठीत लोळण घेतो.कुणी देव भक्तीत दंग होतो तर कुणी खेळ, क्रीडेत रममाण होतो.
                          खरं स्वरूप आवडेनासं होतं.लोकांच्या नजरेत चांगलं दिसावं म्हणून प्रतिष्ठित
असल्याचं सोंग घेणं हेच त्याच्या हातात असतं
                             एकुण स्वत्व दाहक असतं.

Monday, 8 May 2017

भाव तरंग-कळतं पण वळत मात्र नाही.

         सुख दुःख क्षणिक असतं.दोन्हीही मनाच्या धारणाअसतात.जी घटना आपल्याला सुखदायक वाटते ती दुसऱ्याला नेमकी दुःख दायक वाटते.त्यामुळे सुखाविषयी प्रत्येका-
च्या संकल्पना वेगवेगळ्या असू शकतात.
          सुख दुःखाचा संबंध मनोकल्पित असतो.आज सुखदायक असलेली घटना नेहमीच
सुखकारक असेल असे नसते.माणसाचे कौटुंबिक संबंध,त्याच्या इच्छा,आकांक्षा,इतरांकडू-
न अपेक्षा,सांपत्तिक स्थिती,शारीरिक स्वास्थ्य,महत्वाकांक्षा या साऱ्या साऱ्यांचा संबंध
कृतीशी येतो व कृतीचं फलित सुख वा दुःखदायक असतं.कृती ही बाह्य वा आंतरिक
व्यवस्थेवर अवलंबून असते.ठरवलं तसं क्वचितच घडतं व अपेक्षेप्रमाणे यश अपयश मिळतं.
          यश मिळताच मन उल्हसित होतं.आनंदित होतं.अपयश येताच निराश व दुःखी होतं.
अर्थात ही अवस्था परिवर्तनीय असते.पण मन मात्र खंत करीत बसतं दुःखात खंत व सुखात
ही अवस्था अशीच टिकून राहील वा नाही या विषयी चिंता.दोन्हीही गोष्टी अहितकारक.
             सुख दुःखात मनाचा तोल जाता कामा नये.तिथं समता असायला हवी. ती अलिप्त-
तेतूनच प्राप्त होऊ शकते.
               घडणाऱ्या घटनांकडे त्रयस्थ दृष्टीने पाहाता यायला हवं.फक्त कृती कशी केव्हां कितीवेळ करायची एवढंच आपल्या हातात असतं.कृतीचं फलित आपल्या नियंत्रणात नसतं.
                सुख असो वा दुःख दोघांकडे ईश्वरी प्रसाद म्हणून पाहाणारा माणूसच आनंदित
राहू शकतो.कृतीचं फलित आपल्या अपेक्षेप्रमाणेच असायला हवं हा अट्टाहास चुकीचा असतो.
            कळतं सगळ्यांना पण वळत मात्र नाही हीच खरी शोकांतिका असते.

Sunday, 9 April 2017

भावतरंग-अन्तर्मनातील गुंतागुंत

भावतरंग-अन्तर्मनातील गुंतागुंत--- अन्तर्मनातील गुंतागुंत सहजा सहजी लक्षात येत नाही.कधी व कसा अनपेक्षित धक्का ते देते व गाडी मुळ रुळावरून धावू लागते ते कळेनासं होतं.आपण ठरवतो एक.ठाम निश्चय करून काही काळ त्या प्रमाणे वर्तणुक होते.इंद्रियांवर नियंत्रणअसतं.जागृतते मुळे ती विचलित होत नाहीत पण बेसा- वध क्षणीअसं काही घडून येतं की केलेल्या निश्चयाच्या विपरित कृती घडून जाते. व मग पश्चात्तापा शिवाय पर्याय नसतो.ही ससेहोलपट अचानक व अनपेक्षितपणे होत असते.त्याचा ताण असह्य होतो व विपरित कृती घडून येते.मग स्वतःचा स्वतःवरचा ताबा जातो.राग येतो.स्वतःच्या दुबळ्या निश्चया- ची जाणीव होते व मन गदगदतं.हताश व निराश. होतं. अनेकदा असं घडतं.आश्चर्य वाटतं.अन्तर्मनाची अगाध शक्ती अना- कलनीय असते.तिथं शांतता असल्याशिवाय जीवनात शांतीचा अनुभव येत नाही. सारी भौतिक सुख पायाशी लोळण घेत असतानाही अन्तर्मन व्य_ थित असतं.दुःखी असतं.क्रोधाविष्ट असतं.कधी कधी तर ते माणसाला आयु-ष्यातून उठवून लावतं. एकच क्षण बेसावधपणाचा माणसाला खातेऱ्यात ढक- लतो. एकतर तो ठार वेडा तरी होतो वा आत्महत्या तरी करतो.निराश, हताश होऊन जीवनातलं सौंदर्य गमावतो.स्वतः उध्वस्त होतो व इष्ट,मित्र व स्वकियांना संत्रस्त करतो. अन्तर्मन शुद्धी शिवाय खरी शुद्धी होत नाही.ते निर्मळ झाल्यावरच खऱ्या आनंदाचास्रोत गवसतो.अन्यथा सारीच फसवणुक असते

Sunday, 2 April 2017

भावतरंग-व्यक्तीचं वर्तन त्याचं त्यालाच माहीत असतं

भावतरंग.व्यक्तीचं वर्तन त्याचं त्यालाच माहीत असतं. मनाची मोठी गंमत आहे.एकाधी गोष्ट _घटना विसरायची म्हटल्यास ते जमत नाही.मन पुन्हा पुन्हा त्याच घटनेभोवती रुंजी घालतं.दुःखद घटना तर अधिक त्रासदायक होते. झालेला अपमान,कुणी वापरलेले अपशब्द,केलेली निंदा नालस्ती,नसता लावलेलं लांछन मन विसरायला तयार नसतं.घटना घडू- न कितीही काळ उलटला तरी एकांतात तेच चित्र पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर तरळून जातं. जीवनातील सुखद क्षणांचा विसर पडतो.ते क्षण पुन्हा पुन्हा आठवण्या- चा प्रयत्न करावा लागतो. अनेकांशी वेगवेगळ्या संदर्भात आपला संबंध आलेला असतो.त्या त्या व्यक्ती विषयी विशिष्ट प्रकारच्या प्रतिमा मनात तयार झालेल्या असतात.व्यक्ती समोर आली की ती प्रतिमा समोर येते.अर्थात तेच त्या व्यक्तीचं खरं स्वरूप असतं असं मानता कामा नये.कारण आपण फक्त त्याचं बाह्य निरीक्षण केलेलं असतं.त्याच्या अंतरंगाचा ठाव आपण घेऊ शकत नाही.व्यक्तीचं वर्तन त्याचं त्यालाच माहीत असतं. अमुक एका परिस्थीतीत अमुक व्यक्ती अशीच का वागली याची कारणं ज्याची त्यालाच कळतात.व्यक्तीचं वर्तन त्याच्या अंतरंगातील ऊर्मी,त्याचा दृष्टीकोन,त्याच्या अंतस्थ भाव भावना,विचार संक्लपना यावर आधारित अस- तात.हा गुंता उकलणं कठिण असतं. कुणाच्याही वर्तणुकीचा पूर्व अंदाज खरा ठरतोच असे नसते....

Friday, 31 March 2017

भावतरंग- मनाची कर्तूत

भावतरंग -मनाची कर्तूत निश्चय केव्हा ढळतो? स्खलन केव्हा होते?ते कळतही नाही.नकळत सारे घडून येते.घडल्यावर जाणवते.अरे! चुकले.निश्चय तर असा होता मग असे घडलेच कसे?ही सारी मनाची कर्तूत असते.-य मन केव्हा हुलकावणी देते ते कळत नाही.संयम केव्हा ढळला व इंद्रिय सुखाच्या आहारी आपण के्व्हा गेलो तेही कळत नाही. मनच संकल्प करायला लावतं व मनच त्या संकल्पाच्या विपरित इं- द्रियांना चेतवत .मोठी गंमत असते म्हणून प्रत्यही जागृत असायला हवं.जागृत रहाणं म्हणजे सुखरूप रहाणं होय. प्रत्येक क्षण नवा असतो परिवर्तनशील असतो.ती परिवर्तनशीलता पतनाकडे नेत नाही ना हे पाहाणं आपलं कर्तव्य होय.सतत उर्ध्वगमन व्हायला हवं.प्रगमन व्हायला हवं.पिछेहाट होता कामा नये. शब्द,स्पर्श,रूप,रस्,गंध या साऱ्या संवेदनांच्या बाबतीत सतर्क राह्यला हवं. विविध इंद्रियां द्वारे ह्या अनुभूती येत असतात.त्यातूनच चांगल्या वाईटाचं द्न्यान होत असतं.चांगल्याचा स्वीकार व वाईटाचं निर्मूलन हेच लक्ष्य असायला हवं त्यालाच सद्सद विवेक म्हटले जाते .आपली प्रत्येक कृती सत्या- ला धरून झाली तर जो निखळ आनंद मिळतो तोच परमात्मस्पर्श होय.तीच परमात्म प्राप्ती.त्यासाठीच सारी उठाठेव व्हायला हवी.त्यासाठीच अट्टाहास अन्यथा दुःसह असह्य स्थिती.

Wednesday, 29 March 2017

भावतरंग मन म्हणजे इंद्रियांचा राजा

मनाचा आपला हेका असतो. त्याला जे आवडतं तेच पुन्हा पुन्हा करण्याकडे त्याचा कल असतो.मन म्हणजे इंद्रियांचा राजा.तो त्यांच्या कडून हव्या त्या क्रिया करवून घेतो.सुखद,आनंददायक क्रिया इंद्रियांक- रवी पुन्हा पुन्हा करवून घेण्यात त्याला अधिक रस असतो.इंद्रिये मनाचं लांगुलचालन करतात.मनाला रिझविण्यात ती अधिक वेळ घालवू इच्छि- तात.इच्छा हवं नको ते सांगते. संकल्प म्हणजे इप्सित प्राप्त करण्याचा निश्चय. हा निश्चय चांगला, वाईट दोन्हीही असू शकतो.मनाला शॉर्टकट शॉर्टकट खातेऱ्यात नेणाराच असतो.मन बेरकी असतं.त्याचा इंद्रियांना केव्हा हुकूम सुटतो ते कधी कधी कळत नाही.क्रिया घडून जाते.माणूस मात्र अनभिद्न्य असतो व मग तो म्हणतो छे हे असं घडायला नको होतं. असं कसं घडलं ते कळलंच नाही ही मनाची बदमाशी असते.ते तुमच्या सत् संकल्पांना धुडकावून लावतं. नेहमीच जितं मया अशीच त्याची वृत्ती असते.म्हणून मनाच्या बाबतीत जागृत राह्यला हवं.सतत डोळ्यात तेल घालून त्याच्या कलाला समजून घ्यायला हवं.तो कल मोठा विचित्र असतो. मनाचा स्वभाव समजणं कठिण असतं."स्वभावो दरतिक्रमः"मूळ स्वभाव जात नाही म्हणतात.याचा पदोपदी अनुभव येतो. स्वभाव त्रिगुणात्मक असतो-सात्विक,राजसी व तामसी.बहुदा मन राजसी वा तामसी भावनांना त्वरित प्रतिसाद देतं.सात्विक भावनात संयम असतो तो मनाला पसंत नसतो.माणूस वारंवार राजसी व तामसी भावनांना बळी पडतो. सात्विक भाव उर्ध्वगामी असतात. ते माणसाला पूजनीय,वंदनीय बनव- तात.राजसी भाव माणसाला क्रियाशील बनवतात.तामसीभाव माणसातल्या आळशीवृत्तीला प्राधान्य देतात.

Monday, 27 March 2017

भावतरंग- मनाची द्वंद्वात्मक अपत्ये

़़़़़ मनात नको नको ते विचार विचार येतात.भूतकाळातील दुःख,यातना, वेदना देणाऱ्या घटना वा भविष्यात येऊ घातलेल्या मनःकल्पित दुःखदायक संत्रस्त करणाऱ्या अघटित घटनां भोवती मन रुंजी घालतं.त्यामुळे बेचैनी वाढते. अशांतता वाढीस लागते.जे झालं नाही ,कदाचित होणारही नाही,ते झाल्याचा भ्रम होतो तो वाढत जातो.झोपेचं खोबरं होतं. मानसिक तनाव वाढतच जातो.वास्तविक जे पांखरू हातात नाही त्याचा विचार व्यर्थ कळतं पण वळत नाही .हाती जे आहे,या क्षणी जे घडतंय ते अनुभवणं,शब्द, स्पर्श, रूप,रस,गंध यांचा आस्वाद घेणं म्हणजेच वर्तमानात जगणे मनाचा स्वभाव नसतो.अनाकलनीय असतं त्याचं हलणं डुलणं. शरीरात कोणत्या ठिकाणी मन असतं तेही जाणवत नाही. त्याला त्याला आकार नसतो.विकारोत्पत्ती त्याच्या मुळेच होत असते.काम, क्रोध, मद,मोह,लोभ,मत्सर,असुया,द्वेष,ईर्ष्या,महत्वाकांक्षा.जय पराजय,लाभहानी, सुख दुःख,मनाची द्वंद्वात्मक अपत्ये.सारीच तशी उपयुक्त तशीच त्याज्यही मनातलं कुणाला सांगू नये म्हणतात ते त्यामुळेच.कारण मनाचं रूप खोड- खोडसाळ असतं.त्याच्या खोड्या बहुदा विघातकच असतात .शब्द,स्पर्श, रूप, रस, गंध यांची पंचेन्द्रियांद्वारे येणारी अनुभूती हेच खरं सत्य. माणूस शब्दांची फेकाफेक स्वार्थासाठी करतो.लाभासाठी करतो. कधी तो शब्द देतो,तर कधी शब्द फिरवतो .हेतू मात्र स्वार्थच असतो. प्रेमळ शब्द ओठातून बाहेर पडतात पण मनात मात्र आगीचा डोंब उसळलेला असतो.अप्रिय व्यक्ती समोर आल्यावर तिच्या स्वागताचं नाटक करावं लागतं .ही लपवालपवी त्रासदायक असते. परंतु व्यवहारी जगात त्यालाच चातुर्य म्हटलं जातं. गोडगोड बोलून बिनदिक्कत फसवणूक क- रता येते,धोका देता येतो,दगाफटका करता येतो मग अशावेळी आतून माणूस होरपळला जातो.आतएक तर बाहेर दुसरंच अशी कसरत करावी लागल्यामुळे मानसिक ताण मात्र वाढतच जातो......

Sunday, 26 March 2017

भावतरंग-साऱ्या भावना स्वार्थाशी निगडित असतात

... मनातलं खरं खरं सांगायचं म्हटलं तर पंचईतच व्हायची कारण मनात सुप्त इच्छा ,आशा आकांक्षा,अपेक्षा,स्वप्ने यांची वर्दळ नव्हे नव्हे भाऊगर्दी. गर्दीत जसं कुणी कुणाचं नसतं.एक दुसऱ्याशी फारसा संबंध नसतो.मनाती- ल भावोर्मींचंही असंच असतं. वेगवेगळ्या भावनांचा एक दुसऱ्याशी संबंध नसतो.त्यांचं अस्तित्व क्षणैक असतं. लोक मनातलं जाणून घ्यायला उत्सुक असतात.मन मात्र सारं सारं लपवून ठेवण्यात कुशल असतं. अगदी जवळीक असलेल्या जवळ देखील माणूस आपलं मन मो- कळं करायला घाबरतो.तिथंही हात राखून बोलतो.जे बोलतो ते मनात असतंच असं नसतं. रागअनुराग,द्वेषप्रेम ,या भावना जोडीजोडीनं मनात राहतात. साऱ्या भावना मग त्या चांगल्या असोत की वाईट स्वार्थाशीच निग- डित असतात.त्यांचं अंतिम साध्य स्वार्थच असतो.हंसू अन् आंसू ही जोड गोळी माणसाला सतत छळत असते. दुसऱ्याची फजिती पाहून हसू येतं पण स्वतःची फजिती झाली की पण स्वतःची फजिती होताच डोळ्यातून घळघळ आसू ओघळतात. दुसऱ्याचं नुकसान झालं की हसायला होतं पण स्वतःचं नुकसान झालं न् दुसरे हसायला लागले की राग येतो आत्मकेंद्रित वृत्ती सतत उफाळतात .स्व व स्वकियांचं हित एवढंच लक्ष्य राहतं.या हिता आड जे जे येतील त्यांना काहीही करून मार्गा- तून दूर करणं हीच दिशा असतं.

Saturday, 25 March 2017

भावतरंग-आतली खदबद

पाऊस बंद. सूर्य दर्शन.सर्वत्र प्रकाशाच साम्राज्य.सारं कसं चक- चकित.फुलं उमललेली.मुलं हंसरी .माणसं उत्साही .स्रिया आनंदी .पशुपक्षी अन्नाच्या शोधात . प्रकृतीचा माणसाच्या मनावर तत्काळ परीणाम होतो.निसर्गाशी माणसा- च्या भाव भावना निगडितअसतात.मनाचं स्वरूप कळत नाही. भावभावना व विचारांचं आवर्त केव्हा कसं उठेल तेकुणालाच सांगता येत नाही.एखादा शब्द वा एखादं दृश्य माणसाच्या मनाला उद्वेलित करतं. त्या- मुळे वृत्ती बदलतात.क्वचित सुखाच्या तर बहुदा वेदनेच्या भाववृत्ती उफाळून येतात.माणसाला कळतही नाही की केव्हां त्याच्या चेता संस्थेने कोणत्या चे- तकामुळे परिवर्तन स्वीकारलं वा नाकारलं. जग आपल्या गतीनं आपल्याच डौलात चालत असतं कुणाकुणाला तुमची तमा नसते.तुमचं भाव विश्व केवळ तुमचंच असतं.मनात काय काय शिजतंय ते बाहेरच्यांना कळत नाही.ते स्वतःचं स्वतःला जाणवतं. आपलं बीभत्स स्वरूप माणूस लपवू शकतो.तो जसा असतो निखळ तसा समाजापुढे येत नाही.तो जसा असावा असं त्याला वाटत असतं तसं भीवप्रदर्शन तो करतो. भाव विश्व ज्याचं त्याचं स्वतंत्र असतं.त्याचं त्याला जे जे जाणवतं,भा- वतं त्याची त्यालाच ओळख असते.इतरांना वाटतं माणूस खूप आनंदी आहे, शांत आहे पण आतली खदबद, आतल्या वेदना,आनंदोर्मी,खेद वा खंत ज्याची त्यालाच जाणवते.़़़़

Friday, 24 March 2017

भाव तरंग--पण ऐकतंय कोण?

... जसा आहार तसे विचार .जसे विचार तसा संकल्प.जसा संकल्प तसे वागणे.आहारातून शरीर व मनाचं पोषण होतं.आहारातूनच शरीराला व मनाला आवश्यक ऊर्जा मिळते. आहार सात्विक असेल तर ऊर्जा सात्विक राहील.त्यामुळे सात्विक भाव जागृत होतील.सात्विक भावअसले की सात्विक संकल्प.सात्विक संकल्पातून सात्विक कृती.श्रेयस्कर कार्य. अलीकडे फास्ट फुडचं प्रमाण खूपच वाढलंय.माणसाला चमचमीत , रुचकर,मसालेदार, आहार आवडू लागलाय.सामीष आहारची गोडी वाढत चाललीय.जोडीला व्यसनाधीनता.क्रौर्य,चौर्यही वाढत जातंय. आत्मकेंद्रित वृत्ती ,राजसी व तामसी आहार मग कशीबरं मनः शांती मिळेल. आहार केवळ तोंडा द्वारेच घेतला जातो असं नाही.डोळे,कान.नाक व त्वचेद्वाराही आहार घेतला जातो म्हणूनच "बुरा मत देखो,बुरा मत सुनो,बुरा मत बोलो"चा संदेश दिलेला असावा.पण ऐकतंय कोण? घरोघरी दूरदर्शन देमार चित्रपटांचा मारा करतंय. हिंसा,उत्तान प्रणय, भडक शृंगार,द्वयर्थी गाणी,चौर्य,क्रौर्य,खून, मारामाऱ्या,बीबत्छ हावभाव,सारं सारं इंद्रियांना चेतवणारं ,उत्तेजित करणारं चित्रण .कंबर घोळ संगीत साराच धांगडधिंगा.शिवाय मोबाईल वरच्या अश्लील लिंक्स .मग काय अकाली काम भावना जागृतकरणारा जीता जागता मसाला. त्याचे विचित्र परीणाम होणारंच.ते अटळ.नवी पिढी बहकली म्ह णून आरडा ओरड.पण ती का बिघडत चाललीय याचा शोध घेऊन उपाय योजना करायला मात्र कुणालाच वेळ नाही. भोगासक्त जीवनाचं भडक चित्रण चित्रपटांतून होतंय.त्यातलं वैभव, व्यसनासक्ती ,गाडी,बंगला,व त्यांच्या प्राप्तीसाठी केलेल्या लांड्या लबाड्या, ईर्ष्या ,द्वेष,याचीच शिकवण कच्या वयात मिळाळ्यावर अधःपाताच्या मार्गावर पाऊल न पडलेच तर नवल.

Wednesday, 22 March 2017

भाव तरंग ---मनाच्या घिरट्या

.. भाव तरंग---मनाच्या व्यर्थ घिरट्या मनात नको नको ते विचार येतात.विचारांची आवर्तन वाढतंच जातात नकारात्मक तरंगांची संख्या वाढतच जाते.त्यामुळे मन खंतावतं.बेचैनी वाढतच जाते.काळजी,विवंचना, चिंता,भिववतात.असुरक्षिततेची भावना वाढतच जाते. आजची अवस्था आहे तशी राहील की नाही या विषयी भवती न भवती सुरु होते.स्थितीशीलता हा स्वभाव.आरोग्य,आर्थिकस्थिती, कौटुंबिक संबंध सामाजिक प्रतिष्ठा,राजकीय परिस्थिती या विषयी तऱ्हेचे विचार येतात. थोडीशी प्रकृती बिघडली,नैसर्गिकपरिस्थितीत परिवर्तन झाल्यामुळे शारीरिक त्रास वाढला की विचार चक्र भिरभिरु लागतं. ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही त्या गोष्टीचा विचार करणं व्यर्थ असतं.पण मन मात्र त्या गोष्टी भोवतीच गिरक्या घेतअसतं. तशी प्रकृती-आरोग्य काहीसं हातात असतं. खानपान, आहारविहार, व्यायाम,श्रम, विश्राम या सर्वात संतुलन असलं की प्राकृतिक स्वास्थ्य लाभ- तं.पण संतुलन बिघडलं की स्वास्थ्य बिघडतं. शरीर स्वास्थ्याचा मनः स्वास्थ्याशी घनिष्ठ संबंध असतो.मन जरस्थिर असेल तर शरीर ही स्वस्थ राहातं. " शरीरमाद्यम् खलु धर्म साधनम् " शब्द ,स्पर्श,रूप,रस,गंध यांचा आस्वाद शरीराद्वारेच घेता येतो.त्या साठी सर्व इंद्रिये कार्यक्षम असायला हवीत. ऐंद्रिक सुख ही क्षणिकच असतं हेही सदैव ध्यानात ठेवायला हव़...ं .

भाव तरंग-मन म्हणजेच मनुष्य

.... पहाटे पहाटे पुन्हा पावसाला सुरुवात झाली.रात्र कोरडी गेली.रस्त्यावर पाण्याची डबकी साचलेली आहेत.त्यात निवांत क्रीडा करण्यासाठी बेडुक आले पण बिचारे धावत्या गाडी खाली चिरडले गेले.अनपेक्षित घडते ते असे. त्यांच्यासाठी रडणारे कुणी नाहीत.हळहळणारे नाहीत.त्यांच्या पोटांतून आतडी बाहेर आलेली.कावळा ती चोचीने ओरबाडतोय.जीवोsजीवस्य जीवनम् हेच. बेडुक गेला जीवानिशी कावळ्याची मात्र मजा झाली.त्याला आयतं खाद्य मि-ळालं.नशीब एकेकाचं ! मनात सारखे विचार येतात.त्यांना अंत नसतो.विचार तरंगांनी माणूस बेचैन होतो.नको नको त्या प्रतिमा भासमान होतात.भूतकाळातील भुते त्याला भिववतात.क्रोधाविष्ट करतात.भविष्यातील नुकसानीचे विचार त्याला भेडसा- वतात.भूत व भविष्यामुळे त्याचं सँडविच होतं. वर्तमानाचा मागमूस उरत नाही. मन म्हणजेच मनुष्य.ज्याच्या मनात उत्तुंग विचार असतात.त्या विचारां-प्रमाणे ज्याचं वागणं असतं तो सारखी प्रगती करतो.ज्याचे विचार संकुचित असतात केवळ आपण व आपलं कुटुंब त्यांचाच स्वार्थ याभोवतीच त्यांच्या विचारांची गती असते.त्याची प्रगती होत नाही.त्यांची सतत पिछेहाटच होत असते.

भावतरंग-नवीन परिस्थिती

भावतरंग-नवीन परिस्थिती माणसाचं मन नवीन परिस्थितीशी त्वरित जुळवून घेत नाही.त्याला आपल्या रोजच्या दिन क्रमातला बदल सहज स्वीकारता येत नाही. खेड्यात आयुष्याचा मोठा कालखंड घालवल्यानंतर शहरातलं जीवन त्याला सुसह्य होत नाही. बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांच्या बोलण्यात खेडं बरं होतं .तिथं मन लागायचं इथं मन लागत नाही.पण नाइलाज म्हणून राहावं लागतं. सर्व सुविधा असूनही ही अतृप्ती मनाला डाचत असते त्याचं एकमेव कारण म्हणजे इथल्या परिसराशी जुळवून घेता येत नाही हे होय. शेळ्या,मेंढ्या,शेती,शेणगोठा सारं सारं आठवत राहतं व मन सैरभैर होतं. नव्या माणसांशी घसट व्हायला वेळ लागतो

Sunday, 19 March 2017

भावतरंग--

मन निसर्गाशी जुळवून घेत नाही. दिवसरात्र पावसाची रिपरिप.आभाळभरलेलं.घरांच्या छतांना ओलसरपणा आलेला.झाडं वेली पाण्यात उभी.थंडगार वारं अंगाला झोंबणारं.छत्री शिवाय बाहेर पडतायेणं अशक्य.जा ये छत्री वा रेनकोट घालून सुरु. प्राजक्ताच्या झाडाखाली फुलांचा खच.जागोजागी बदामाच्या झाडाखाली बदामाची फळं.विजेच्या तारांवर कुठेकुठे पक्षी बसलेले.चिमण्या, कबुतरं,सा- ळुंक्या पंखं मिटून शांतपणे पावसात भिजण्याची चाखताहेत मजा.मैदानात मोकाट कुत्री फिरताहेत .केकाटणं नाही की किंचाळणं नाही. पशुपक्षी,वनस्पती,झाडंवेली,सारे सारे निमुटपणे पावसात भिजतात.कुठ- लीही तक्रार वा कुरकुर न करता. जे आपल्याला थांबवता येत नाही ते निमुटपणे आनंदाने स्वीकारायला हवं त्यातूनच आनंद मिळतो हेच का त्या सर्वांना सांगायच असतं?निसर्गातील घट- ना चक्रावर कुणाचंच नियंत्रण नसतं. पाऊस म्हणजे एक चमत्कार. संजीवकच तो.तृषार्त मातीची तृष्णा तो भा-गवतो.त्याच्या आगमनाने जीव जंतू ,पशु पक्षी,स्रीपुरूष,आनंदित होतात.माती- चा कण कण प्रसूत होतो.सर्वत्र लुसलुसित हिरवं गवत दिसायला लागतं.अनेक जीव जिवाणू पावसाच्या दिवसात दिसायला लागतात.बेडकांचा डराव डराव आवाज कानांवर पडतो.गोगलगायी दिसू लागतात. मुंग्यांना पंख फुटतात. नद्या नाले भरभरून वाहातात.सगळी कडे आनंदी आनंद असतो. मन मात्र निसर्गाशी जुळवून घेत नाही.त्याचं आपलं वेगळंच. वैताग.वखवख.आक्रस्ताळे पणा.

अन्तर्नाद --- शहरातील एक पहाट

आनंदी पहाट .आकाश निरभ्र.सर्वत्र निळाई.कुठेही काळे ढग नाहीत. सूर्य दर्शन .लखलखीत प्रकाश.रस्ते स्वच्छ.झाडे टवटवीत. मनही रिक्त.धीमे चाल.वहातुक सुरू बसणं मात्र बंद. दुकानंही उघडली नाहीत.नाही म्हणायला रिक्षा थांब्या जवळची चहाची दुकानं तेवढी सुरू झाले- ली.चहा,पोहे,भजी,पाव,वडे खाताहेत कुणी कुणी.थांब्यावर रिक्षा उभ्या आहेत रिक्षा चालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत. मन तरल.डोक्यात कुठलाच विचार नाही. पावलं झपाझप पडताहेत. कुठे पारवे.कुठे एकाधा कावळा.उडणाऱ्या चिमण्या विजेच्या तारेवर बसकण.पंख फडफडवणं.दूर कुठे कोकिळा कुहू कुहू करतेय.मोकाट कुत्रे मैदानात भांडताहेत. पाळीव संकरित कुत्र्यांचे मालक प्रातर्विधी साठी कुत्र्यांना घेऊन बाहेर पड-ताहेत. शहर असल्याने बैल,गाय, घोडे ,म्हशी मात्र दिसत नाहीत.बैल गाड्या नाहीत. चुकपाट बकऱ्यावाला बकऱ्या वाळतोय. मैदानात मुले फुटबॉल खेळताहेत.त्यांचा गिल्ला सुरू आहे. क्रिकेट स्टेडियमवर बरेच जण फिरायला आले आहेत.काही जोरबैठका काढताहेत, काही योगासने,प्राणायामादित मग्न.तर काही जॉगिंग मध्ये गुंग. रस्त्याच्या दुतर्फा गवत उगवलंय हिरवंगार,लुसलुसीत.हिरवा गालिचाच जणु निसर्गानं अंथरलाय.बंगल्याच्या आवारातही हिरवळ,वृक्षवेली पाना फुलांनी डंवरल्याहेत घंटा गाडी कचरा गोळा करतेय...

Saturday, 18 March 2017

भाव तरंग-मनाच्या अनाकलनीय चेष्टा

भावतरंग-मनाच्या अनाकलनीय चेष्टा झिमझिम पाऊस पडतोय.रस्ते ओलेचिंब आहेत.बाहेर जायची इच्छा असूनही बाहेर जाता येत नाही.हवेत गारठा आहे.झोंबरे वारे वाहाताहेत. समोरच्या बंगल्याच्या कौलावर एक कबूतर पंख मिटून बसलंय.सगळीकडे शुकशुकाट.रोजची कामे धीमे गतीने होताहेत.तीन तांबे पाणी अंगावर टाकून स्नान झालं. मनात मात्र रिक्तता आहे प्रकृतीशी मनाचं समायोजन. क्वचितच होतं.प्रकृती- त .होणारं परिवर्तन कधीकधी मनाने अस्पर्शितंच राहातं.मनाची आपली चाल असते.सभोवतालचं जग आपापल्या उलथापालथीत निमग्न असतं तर मनात मात्र भगभग असते. बाहेर स्तब्धता आत मात्र भावभावनांचा उसळता डोंब. माणसाचे भाव सारखे बदलते असतात.त्यात स्थैर्य नसतं.मन ताब्यात राहू इच्छित नाही. स्वतःचंस्वतःचं स्वातंत्र्य ते अबाधित ठेवतं.त्याचं आपलं अस्तित्व इतर सर्वांवर मात करतं. मनाचा रेख लक्षात येत नाही .वाटतं तिथं शांतता आहे.स्तब्धता आहे.तर दुसऱ्या क्षणीतिथं वादळ उठलेलं असतं.उद्विग्नताअसते .कारण काहीही नसतं. मनाच्या अनाकलनीय चेष्टा. मनाची हमशाही. स्वतःची ही विक्षिप्तता,हे वेडेपण माणूस इतरां पासून लपवित असतो.आतली भगभग,उसळत्या लाटा त्याने दाबून ठेवलेल्या असतात.आेठावर हंसू अंतरात आसू अशी विचित्र अवस्था असते. मन आनंदी असायला हवं.वास्तविक आनंद त्याचं मूळ रूप पण नेमका त्याचाच त्याला विसर पडतो.

Thursday, 16 March 2017

अंतर्नाद-स्वभाव स्वतःलाच कळतो-

स्वभाव स्वतःलाच कळतो.तो कप्पा इतरांना अद्न्यात असतो.अन्तर्मनातली खदबद स्वतःलाच जाणवते.इतरांना ती दिसत नसते. अन्तर्मनातले भाव लपवण्याचं कौशल्य फक्त मानव प्राण्यात असतं.आपले भाव सर्वच्या सर्व जसेच्या तसे जर माणूस प्रकट करील तर त्याचं स्वार्थी रूप जगाला दिसून येईल व त्याची कवडी किंमत होईल. द्वेष,ईर्ष्या,क्रोध,लोभ सारं सारं माणसाला लपवता येतं.तो जसा असतो तसा क्वचितच दृष्टीगत होतो.त्याचं बाह्य रूप तो अधिकाधिक आकर्षक व प्रभावी ठेवण्याचा प्रयत्न करतो.त्याचं बोलणं,चालणं,उठणं,बसणं कृत्रिम असतं.मनात असतं ते तो बोलतोच असं नाही.आपलं खरं स्वरूप तो लपवित असतो.वैभव, संपत्ती,समृद्धी,घरदार,बंगला,गाडी मिळवण्यासाठी,वैभव प्रतिष्ठा प्राप्ती साठी त्याची धडपड असते.त्यासाठी नको तिथं समझोता असतो.नकोते मार्ग तो अवलंबतो.परंतू अन्तर्मन तो एकटा असतो तेव्हाआतून टोचणी देत.गाडी, बंगला वैभव कसं मिळालं हे जर तो खरं खरं सांगू लागला तर त्याची नाचक्कीच होईल सारं काही वाम मार्गाने मिळावावं लागलं याची त्याला जाणीव होते. वैभव प्रतिष्ठा मिळवूनही तो संतुष्ट नसतो.मन आतून धक्के देत असतं त्याची भर्त्सना करीत असतं.ती टोचणी भयंकर असते ती टोचणी कमी व्हावी म्हणून तो व्यसनाधीन होतो.त्याचं स्वतःचं क्रौर्य,चौर्य जगा पासून लपवता लपवता तो दुहेरी जीवन जगू लागतो.शेवटी आप्तेष्ट,सगे संबंधी,मित्र परीवार साऱ्यां-पासून तो दुरावतो.

Wednesday, 15 March 2017

निसर्गात मात्र असं नसतं

.. जो जो मनाचा वेध घ्यावा तो तो माणूस विस्मित होतो.मनातले भाव तरंग. त्यांचं चांचल्य,त्यांची विविधता,सारं सारं चमत्कारिक.स्वतःचं मनइतकं विचित्र असल्याची जाण तटस्थपणे त्याचं निरीक्षण केल्यावरच समजून येते. मन म्हणजे विविध लाटा.अगणित.कधी सुखावणाऱ्या तर कधीदुखावणाऱ्या मनाचं चांचल्य स्वतःचं स्वतःलाच कळतं.पण माणूस मात्र मुखवटा धारणकरतो. व जे आहे ते लपवतो.आपले खरे भाव समोरच्याला कळले तर मोठाअनर्थहोईल असे त्याला सातत्याने वाटत असते.त्यामुळे त्याचं उठणं बसणं ,बोलणं चालणं सारं सारं कृत्रिम होत जातं.त्यामुळे मनात उठणाऱ्या ऊर्मींना दाबून ठेवावंलागत हे दमन दुःखदायक ठरतं.तेच उतार वयात मनाचं दुखणं बनतं व माणूस मानसिक दृष्ट्या रोगी बनत जातो. माणसाची हाव सारखी वाढत जाते.त्याला हवं ते मिळालं तरी मन तृप्त होत नाही.नवी वासना जन्म घेते व तिच्या प्राप्तीसाठी धावपळ सुरू होते.क्षणाचीही उसंत नसते.विश्रांती नसते.सारखी धावाधाव. येतांना काही आणलं नव्हतं .जातांनाही रिक्त हातांनीच जावं लागतं. इथलं वैभव,इथली संपत्ती,घर दार,आप्त स्वजन,चल अचल मिळकत सारं सारं इथल्या इथं राहतं.माणसाला कळतं हे पण वळत मात्र नाही. जे आपल्याला मिळालंय ते प्रकृतीनं दिलंय.त्याचा दखल माणूस घेत नाही. जे आपल्या जवळ नाही त्याच्या प्राप्तीसाठी धडपड अपूर्णतेची रुखरुख व प्रयत्नांतीही अपयश आल्यास नैराश्य. निसर्गात मात्र असं नसतं .तिथं हाव नाही की धावाधाव नाही.सारं कसं गु पचुप अनायसे घडत जातं.प्रत्यही परिवर्तन होतं पण कुरकुर नसते की भांडण नसतं.निमुटपणे जे जे घडतं त्या त्या घटनेशी जुळवून घेतले जाते.कुणा कुणाची तक्रार नसते.आका्क्षा वा अपेक्षा नसते.