.. भाव तरंग---मनाच्या व्यर्थ घिरट्या मनात नको नको ते विचार येतात.विचारांची आवर्तन वाढतंच जातात नकारात्मक तरंगांची संख्या वाढतच जाते.त्यामुळे मन खंतावतं.बेचैनी वाढतच जाते.काळजी,विवंचना, चिंता,भिववतात.असुरक्षिततेची भावना वाढतच जाते. आजची अवस्था आहे तशी राहील की नाही या विषयी भवती न भवती सुरु होते.स्थितीशीलता हा स्वभाव.आरोग्य,आर्थिकस्थिती, कौटुंबिक संबंध सामाजिक प्रतिष्ठा,राजकीय परिस्थिती या विषयी तऱ्हेचे विचार येतात. थोडीशी प्रकृती बिघडली,नैसर्गिकपरिस्थितीत परिवर्तन झाल्यामुळे शारीरिक त्रास वाढला की विचार चक्र भिरभिरु लागतं. ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही त्या गोष्टीचा विचार करणं व्यर्थ असतं.पण मन मात्र त्या गोष्टी भोवतीच गिरक्या घेतअसतं. तशी प्रकृती-आरोग्य काहीसं हातात असतं. खानपान, आहारविहार, व्यायाम,श्रम, विश्राम या सर्वात संतुलन असलं की प्राकृतिक स्वास्थ्य लाभ- तं.पण संतुलन बिघडलं की स्वास्थ्य बिघडतं. शरीर स्वास्थ्याचा मनः स्वास्थ्याशी घनिष्ठ संबंध असतो.मन जरस्थिर असेल तर शरीर ही स्वस्थ राहातं. " शरीरमाद्यम् खलु धर्म साधनम् " शब्द ,स्पर्श,रूप,रस,गंध यांचा आस्वाद शरीराद्वारेच घेता येतो.त्या साठी सर्व इंद्रिये कार्यक्षम असायला हवीत. ऐंद्रिक सुख ही क्षणिकच असतं हेही सदैव ध्यानात ठेवायला हव़...ं .
No comments:
Post a Comment