Saturday, 25 March 2017

भावतरंग-आतली खदबद

पाऊस बंद. सूर्य दर्शन.सर्वत्र प्रकाशाच साम्राज्य.सारं कसं चक- चकित.फुलं उमललेली.मुलं हंसरी .माणसं उत्साही .स्रिया आनंदी .पशुपक्षी अन्नाच्या शोधात . प्रकृतीचा माणसाच्या मनावर तत्काळ परीणाम होतो.निसर्गाशी माणसा- च्या भाव भावना निगडितअसतात.मनाचं स्वरूप कळत नाही. भावभावना व विचारांचं आवर्त केव्हा कसं उठेल तेकुणालाच सांगता येत नाही.एखादा शब्द वा एखादं दृश्य माणसाच्या मनाला उद्वेलित करतं. त्या- मुळे वृत्ती बदलतात.क्वचित सुखाच्या तर बहुदा वेदनेच्या भाववृत्ती उफाळून येतात.माणसाला कळतही नाही की केव्हां त्याच्या चेता संस्थेने कोणत्या चे- तकामुळे परिवर्तन स्वीकारलं वा नाकारलं. जग आपल्या गतीनं आपल्याच डौलात चालत असतं कुणाकुणाला तुमची तमा नसते.तुमचं भाव विश्व केवळ तुमचंच असतं.मनात काय काय शिजतंय ते बाहेरच्यांना कळत नाही.ते स्वतःचं स्वतःला जाणवतं. आपलं बीभत्स स्वरूप माणूस लपवू शकतो.तो जसा असतो निखळ तसा समाजापुढे येत नाही.तो जसा असावा असं त्याला वाटत असतं तसं भीवप्रदर्शन तो करतो. भाव विश्व ज्याचं त्याचं स्वतंत्र असतं.त्याचं त्याला जे जे जाणवतं,भा- वतं त्याची त्यालाच ओळख असते.इतरांना वाटतं माणूस खूप आनंदी आहे, शांत आहे पण आतली खदबद, आतल्या वेदना,आनंदोर्मी,खेद वा खंत ज्याची त्यालाच जाणवते.़़़़

No comments:

Post a Comment