Wednesday, 15 March 2017
निसर्गात मात्र असं नसतं
.. जो जो मनाचा वेध घ्यावा तो तो माणूस विस्मित होतो.मनातले भाव तरंग.
त्यांचं चांचल्य,त्यांची विविधता,सारं सारं चमत्कारिक.स्वतःचं मनइतकं विचित्र
असल्याची जाण तटस्थपणे त्याचं निरीक्षण केल्यावरच समजून येते.
मन म्हणजे विविध लाटा.अगणित.कधी सुखावणाऱ्या तर कधीदुखावणाऱ्या
मनाचं चांचल्य स्वतःचं स्वतःलाच कळतं.पण माणूस मात्र मुखवटा धारणकरतो.
व जे आहे ते लपवतो.आपले खरे भाव समोरच्याला कळले तर मोठाअनर्थहोईल
असे त्याला सातत्याने वाटत असते.त्यामुळे त्याचं उठणं बसणं ,बोलणं चालणं
सारं सारं कृत्रिम होत जातं.त्यामुळे मनात उठणाऱ्या ऊर्मींना दाबून ठेवावंलागत
हे दमन दुःखदायक ठरतं.तेच उतार वयात मनाचं दुखणं बनतं व माणूस मानसिक दृष्ट्या रोगी बनत जातो.
माणसाची हाव सारखी वाढत जाते.त्याला हवं ते मिळालं तरी मन तृप्त होत
नाही.नवी वासना जन्म घेते व तिच्या प्राप्तीसाठी धावपळ सुरू होते.क्षणाचीही
उसंत नसते.विश्रांती नसते.सारखी धावाधाव.
येतांना काही आणलं नव्हतं .जातांनाही रिक्त हातांनीच जावं लागतं. इथलं
वैभव,इथली संपत्ती,घर दार,आप्त स्वजन,चल अचल मिळकत सारं सारं इथल्या
इथं राहतं.माणसाला कळतं हे पण वळत मात्र नाही.
जे आपल्याला मिळालंय ते प्रकृतीनं दिलंय.त्याचा दखल माणूस घेत नाही.
जे आपल्या जवळ नाही त्याच्या प्राप्तीसाठी धडपड अपूर्णतेची रुखरुख व
प्रयत्नांतीही अपयश आल्यास नैराश्य.
निसर्गात मात्र असं नसतं .तिथं हाव नाही की धावाधाव नाही.सारं कसं गु
पचुप अनायसे घडत जातं.प्रत्यही परिवर्तन होतं पण कुरकुर नसते की भांडण
नसतं.निमुटपणे जे जे घडतं त्या त्या घटनेशी जुळवून घेतले जाते.कुणा कुणाची
तक्रार नसते.आका्क्षा वा अपेक्षा नसते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment