Sunday, 19 March 2017
भावतरंग--
मन निसर्गाशी जुळवून घेत नाही.
दिवसरात्र पावसाची रिपरिप.आभाळभरलेलं.घरांच्या छतांना ओलसरपणा
आलेला.झाडं वेली पाण्यात उभी.थंडगार वारं अंगाला झोंबणारं.छत्री शिवाय
बाहेर पडतायेणं अशक्य.जा ये छत्री वा रेनकोट घालून सुरु.
प्राजक्ताच्या झाडाखाली फुलांचा खच.जागोजागी बदामाच्या झाडाखाली
बदामाची फळं.विजेच्या तारांवर कुठेकुठे पक्षी बसलेले.चिमण्या, कबुतरं,सा-
ळुंक्या पंखं मिटून शांतपणे पावसात भिजण्याची चाखताहेत मजा.मैदानात
मोकाट कुत्री फिरताहेत .केकाटणं नाही की किंचाळणं नाही.
पशुपक्षी,वनस्पती,झाडंवेली,सारे सारे निमुटपणे पावसात भिजतात.कुठ-
लीही तक्रार वा कुरकुर न करता.
जे आपल्याला थांबवता येत नाही ते निमुटपणे आनंदाने स्वीकारायला हवं
त्यातूनच आनंद मिळतो हेच का त्या सर्वांना सांगायच असतं?निसर्गातील घट-
ना चक्रावर कुणाचंच नियंत्रण नसतं.
पाऊस म्हणजे एक चमत्कार. संजीवकच तो.तृषार्त मातीची तृष्णा तो भा-गवतो.त्याच्या आगमनाने जीव जंतू ,पशु पक्षी,स्रीपुरूष,आनंदित होतात.माती-
चा कण कण प्रसूत होतो.सर्वत्र लुसलुसित हिरवं गवत दिसायला लागतं.अनेक
जीव जिवाणू पावसाच्या दिवसात दिसायला लागतात.बेडकांचा डराव डराव
आवाज कानांवर पडतो.गोगलगायी दिसू लागतात. मुंग्यांना पंख फुटतात.
नद्या नाले भरभरून वाहातात.सगळी कडे आनंदी आनंद असतो.
मन मात्र निसर्गाशी जुळवून घेत नाही.त्याचं आपलं वेगळंच.
वैताग.वखवख.आक्रस्ताळे पणा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment