Sunday, 26 March 2017

भावतरंग-साऱ्या भावना स्वार्थाशी निगडित असतात

... मनातलं खरं खरं सांगायचं म्हटलं तर पंचईतच व्हायची कारण मनात सुप्त इच्छा ,आशा आकांक्षा,अपेक्षा,स्वप्ने यांची वर्दळ नव्हे नव्हे भाऊगर्दी. गर्दीत जसं कुणी कुणाचं नसतं.एक दुसऱ्याशी फारसा संबंध नसतो.मनाती- ल भावोर्मींचंही असंच असतं. वेगवेगळ्या भावनांचा एक दुसऱ्याशी संबंध नसतो.त्यांचं अस्तित्व क्षणैक असतं. लोक मनातलं जाणून घ्यायला उत्सुक असतात.मन मात्र सारं सारं लपवून ठेवण्यात कुशल असतं. अगदी जवळीक असलेल्या जवळ देखील माणूस आपलं मन मो- कळं करायला घाबरतो.तिथंही हात राखून बोलतो.जे बोलतो ते मनात असतंच असं नसतं. रागअनुराग,द्वेषप्रेम ,या भावना जोडीजोडीनं मनात राहतात. साऱ्या भावना मग त्या चांगल्या असोत की वाईट स्वार्थाशीच निग- डित असतात.त्यांचं अंतिम साध्य स्वार्थच असतो.हंसू अन् आंसू ही जोड गोळी माणसाला सतत छळत असते. दुसऱ्याची फजिती पाहून हसू येतं पण स्वतःची फजिती झाली की पण स्वतःची फजिती होताच डोळ्यातून घळघळ आसू ओघळतात. दुसऱ्याचं नुकसान झालं की हसायला होतं पण स्वतःचं नुकसान झालं न् दुसरे हसायला लागले की राग येतो आत्मकेंद्रित वृत्ती सतत उफाळतात .स्व व स्वकियांचं हित एवढंच लक्ष्य राहतं.या हिता आड जे जे येतील त्यांना काहीही करून मार्गा- तून दूर करणं हीच दिशा असतं.

No comments:

Post a Comment