Sunday, 19 March 2017
अन्तर्नाद --- शहरातील एक पहाट
आनंदी पहाट .आकाश निरभ्र.सर्वत्र निळाई.कुठेही काळे ढग नाहीत. सूर्य दर्शन .लखलखीत प्रकाश.रस्ते स्वच्छ.झाडे टवटवीत.
मनही रिक्त.धीमे चाल.वहातुक सुरू बसणं मात्र बंद. दुकानंही उघडली नाहीत.नाही म्हणायला रिक्षा थांब्या जवळची चहाची दुकानं तेवढी सुरू झाले-
ली.चहा,पोहे,भजी,पाव,वडे खाताहेत कुणी कुणी.थांब्यावर रिक्षा उभ्या आहेत
रिक्षा चालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत.
मन तरल.डोक्यात कुठलाच विचार नाही. पावलं झपाझप पडताहेत.
कुठे पारवे.कुठे एकाधा कावळा.उडणाऱ्या चिमण्या विजेच्या तारेवर बसकण.पंख फडफडवणं.दूर कुठे कोकिळा कुहू कुहू करतेय.मोकाट कुत्रे
मैदानात भांडताहेत.
पाळीव संकरित कुत्र्यांचे मालक प्रातर्विधी साठी कुत्र्यांना घेऊन बाहेर पड-ताहेत.
शहर असल्याने बैल,गाय, घोडे ,म्हशी मात्र दिसत नाहीत.बैल गाड्या नाहीत.
चुकपाट बकऱ्यावाला बकऱ्या वाळतोय.
मैदानात मुले फुटबॉल खेळताहेत.त्यांचा गिल्ला सुरू आहे. क्रिकेट स्टेडियमवर बरेच जण फिरायला आले आहेत.काही जोरबैठका काढताहेत,
काही योगासने,प्राणायामादित मग्न.तर काही जॉगिंग मध्ये गुंग.
रस्त्याच्या दुतर्फा गवत उगवलंय हिरवंगार,लुसलुसीत.हिरवा गालिचाच जणु
निसर्गानं अंथरलाय.बंगल्याच्या आवारातही हिरवळ,वृक्षवेली पाना फुलांनी
डंवरल्याहेत
घंटा गाडी कचरा गोळा करतेय...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment