छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करणाऱ्या तरुणांनो
त्यांचे यशोगानगाणाऱ्या भाटांनो,स्फूर्तिगीते म्हणणाऱ्या शाहिरांनो,
महाराज पुण्यश्लोक श्रीमंत योगीहोते.मन्वंतरकर्ता ,शककर्ता ,
रयतेचा पोशिंदा होते.
हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणणारे ते दिव्य भूपाल होते.
गोपाल होते,पाशवी नृशंसशक्तीचा निप्पात करणारे कर्दनकाळहोते.
त्या पुरुषसिंहाने निद्रिस्त महाराष्ट्रात एकट्याने स्वत्वाला जाणले.
स्वातंत्र्याची पूजा बांधली.समतेचे, न्यायाचे राज्य आणले.
त्यांच्या यशोगाथा अजूनही गाताहेत गड किल्ले,कडे कपारी,
डोंगर दऱ्या हर्षोतफुल्ल होऊन.
मनामनात कणाकणात आजही ती ललकारीउठते "हरहर महादेव".
तेस्वराज्य सुराज्य होतं.खरं हिंदवी राज्य होतं.पाशवी,जुलमी,अन्यायी,
शोषण करणाऱ्या आडदांड ,बलदंडशक्ती मग त्या मोगली असोत वा
आप्तस्वकीय असोत कुणाकुणाची तमा न बाळगता स्वराज्याच्या
संकल्पनेला विरोध करणाऱ्यांचा त्याने खातमा केला तमा कशाची
न ठेवता बेधडक,बिनदिक्कत दाखवली भल्याभल्यांना यमसदनाची
वाट.
राष्ट्राची उभारणी करतांना सर्वांना घेऊन चाललं पाहिजे याची त्यांना
जाण होती.प्रत्येकातला गुण ना गुण पारखून ज्याच्या त्याच्या वकूबा-
प्रमाणे त्यांनी या महान कार्यात सक्रीय सहभाग घ्यायला भाग पाडलं.
सर्व जाती जमातीच्या लोकांना कामाला लावून जातियतेचं विष मारून
टाकलं.
तो धर्माभिमानी होता.धर्मवेडा नव्हता. विधर्मियांचेही त्याने सहकार्य
घेतले हवे तेथे हवे तेव्हा.त्यांच्या विविध दलातील अधिकारी केवळ
हिंदूच नव्हते.त्याच्या जीवश्चकंठश्च मित्रातही वेगवेगळ्या जाती धर्माचे
वर्णाचे लोक होते.
इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज यांनाही त्यांनी अकारण छळले नाही. उलट त्यांच्या
प्रगत द्न्यानाचा उपयोग शस्रास्र निर्मिती साठी करून घेतला.
त्यांची प्रद्न्या,त्यांची दृष्टी अलौकिक होती.म्हणूनच आमच्या फुटपट्टीने
त्यांना मापणं योग्य नाही व शक्यही नाही.
त्यांच्या उत्तुंग उंचीचा वेध घेणं असंभव,अशक्य.
साधु,संत,फकीर, अवलिये दिव्यत्वाची पूजा बांधणारेकोणीही असोत ते
त्यांचे त्यांनी आशीर्वादच मागितले.नम्र होऊन अभिवादन केले त्यांना.
चुकूनही अहंभावाचा अभिनिवेश आपल्या वागण्या बोलण्यातून दिसू
न देता सर्वांची हृदये जिंकणारा तो महान सम्राट होता.
मंदिर ,मशिदी ,दर्गे,देवस्थाने यांना देणग्या देतांना त्याने आपपरभाव
दाखवला नाही.कुराण पुराण नाही म्हणून त्यांनी त्याची हेटाळणी केली
नाही.त्या पवित्र ग्रंथाचा अवमान केला नाही.त्यांच्या सैन्यात,नौदलात,
अश्वदलातअनेक विधर्मी मोठ मोठ्या अधिकार पदावर होते.सैन्य भरतीत
मुस्लिमांना मज्जाव नव्हता.
स्वातंत्र्य,समता,बंधुता या मूल्यांची शिवकालात त्यांनी जपणूक केली.
दलितांना,दुःखितांना ,त्यांनी उदार आश्रय दिला.महार, मांग,रामोशी
सर्वांना योग्य ते काम दिले.सर्वांच्या बलाचा वापर करून स्वराज्याची
उभारणीकेली.स्थापना केली.
महाराष्ट्राची शान वाढवली.मानउंचावली.आज या शतकात त्या दिव्य
पुरुषसिंहाची प्रकर्षाने आठवण येते .आज ते हवे होते,हवे होते.