Wednesday, 22 March 2017
भाव तरंग-मन म्हणजेच मनुष्य
.... पहाटे पहाटे पुन्हा पावसाला सुरुवात झाली.रात्र कोरडी गेली.रस्त्यावर
पाण्याची डबकी साचलेली आहेत.त्यात निवांत क्रीडा करण्यासाठी बेडुक आले पण बिचारे धावत्या गाडी खाली चिरडले गेले.अनपेक्षित घडते ते असे.
त्यांच्यासाठी रडणारे कुणी नाहीत.हळहळणारे नाहीत.त्यांच्या पोटांतून आतडी
बाहेर आलेली.कावळा ती चोचीने ओरबाडतोय.जीवोsजीवस्य जीवनम् हेच.
बेडुक गेला जीवानिशी कावळ्याची मात्र मजा झाली.त्याला आयतं खाद्य मि-ळालं.नशीब एकेकाचं !
मनात सारखे विचार येतात.त्यांना अंत नसतो.विचार तरंगांनी माणूस
बेचैन होतो.नको नको त्या प्रतिमा भासमान होतात.भूतकाळातील भुते त्याला
भिववतात.क्रोधाविष्ट करतात.भविष्यातील नुकसानीचे विचार त्याला भेडसा-
वतात.भूत व भविष्यामुळे त्याचं सँडविच होतं. वर्तमानाचा मागमूस उरत नाही.
मन म्हणजेच मनुष्य.ज्याच्या मनात उत्तुंग विचार असतात.त्या विचारां-प्रमाणे ज्याचं वागणं असतं तो सारखी प्रगती करतो.ज्याचे विचार संकुचित
असतात केवळ आपण व आपलं कुटुंब त्यांचाच स्वार्थ याभोवतीच त्यांच्या
विचारांची गती असते.त्याची प्रगती होत नाही.त्यांची सतत पिछेहाटच होत
असते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment