Friday, 24 March 2017

भाव तरंग--पण ऐकतंय कोण?

... जसा आहार तसे विचार .जसे विचार तसा संकल्प.जसा संकल्प तसे वागणे.आहारातून शरीर व मनाचं पोषण होतं.आहारातूनच शरीराला व मनाला आवश्यक ऊर्जा मिळते. आहार सात्विक असेल तर ऊर्जा सात्विक राहील.त्यामुळे सात्विक भाव जागृत होतील.सात्विक भावअसले की सात्विक संकल्प.सात्विक संकल्पातून सात्विक कृती.श्रेयस्कर कार्य. अलीकडे फास्ट फुडचं प्रमाण खूपच वाढलंय.माणसाला चमचमीत , रुचकर,मसालेदार, आहार आवडू लागलाय.सामीष आहारची गोडी वाढत चाललीय.जोडीला व्यसनाधीनता.क्रौर्य,चौर्यही वाढत जातंय. आत्मकेंद्रित वृत्ती ,राजसी व तामसी आहार मग कशीबरं मनः शांती मिळेल. आहार केवळ तोंडा द्वारेच घेतला जातो असं नाही.डोळे,कान.नाक व त्वचेद्वाराही आहार घेतला जातो म्हणूनच "बुरा मत देखो,बुरा मत सुनो,बुरा मत बोलो"चा संदेश दिलेला असावा.पण ऐकतंय कोण? घरोघरी दूरदर्शन देमार चित्रपटांचा मारा करतंय. हिंसा,उत्तान प्रणय, भडक शृंगार,द्वयर्थी गाणी,चौर्य,क्रौर्य,खून, मारामाऱ्या,बीबत्छ हावभाव,सारं सारं इंद्रियांना चेतवणारं ,उत्तेजित करणारं चित्रण .कंबर घोळ संगीत साराच धांगडधिंगा.शिवाय मोबाईल वरच्या अश्लील लिंक्स .मग काय अकाली काम भावना जागृतकरणारा जीता जागता मसाला. त्याचे विचित्र परीणाम होणारंच.ते अटळ.नवी पिढी बहकली म्ह णून आरडा ओरड.पण ती का बिघडत चाललीय याचा शोध घेऊन उपाय योजना करायला मात्र कुणालाच वेळ नाही. भोगासक्त जीवनाचं भडक चित्रण चित्रपटांतून होतंय.त्यातलं वैभव, व्यसनासक्ती ,गाडी,बंगला,व त्यांच्या प्राप्तीसाठी केलेल्या लांड्या लबाड्या, ईर्ष्या ,द्वेष,याचीच शिकवण कच्या वयात मिळाळ्यावर अधःपाताच्या मार्गावर पाऊल न पडलेच तर नवल.

No comments:

Post a Comment