Wednesday, 29 March 2017
भावतरंग मन म्हणजे इंद्रियांचा राजा
मनाचा आपला हेका असतो. त्याला जे आवडतं तेच पुन्हा पुन्हा करण्याकडे त्याचा कल असतो.मन म्हणजे इंद्रियांचा राजा.तो त्यांच्या
कडून हव्या त्या क्रिया करवून घेतो.सुखद,आनंददायक क्रिया इंद्रियांक-
रवी पुन्हा पुन्हा करवून घेण्यात त्याला अधिक रस असतो.इंद्रिये मनाचं
लांगुलचालन करतात.मनाला रिझविण्यात ती अधिक वेळ घालवू इच्छि-
तात.इच्छा हवं नको ते सांगते. संकल्प म्हणजे इप्सित प्राप्त करण्याचा
निश्चय. हा निश्चय चांगला, वाईट दोन्हीही असू शकतो.मनाला शॉर्टकट
शॉर्टकट खातेऱ्यात नेणाराच असतो.मन बेरकी असतं.त्याचा इंद्रियांना
केव्हा हुकूम सुटतो ते कधी कधी कळत नाही.क्रिया घडून जाते.माणूस
मात्र अनभिद्न्य असतो व मग तो म्हणतो छे हे असं घडायला नको होतं.
असं कसं घडलं ते कळलंच नाही ही मनाची बदमाशी असते.ते तुमच्या
सत् संकल्पांना धुडकावून लावतं. नेहमीच जितं मया अशीच त्याची वृत्ती
असते.म्हणून मनाच्या बाबतीत जागृत राह्यला हवं.सतत डोळ्यात तेल
घालून त्याच्या कलाला समजून घ्यायला हवं.तो कल मोठा विचित्र असतो.
मनाचा स्वभाव समजणं कठिण असतं."स्वभावो दरतिक्रमः"मूळ स्वभाव
जात नाही म्हणतात.याचा पदोपदी अनुभव येतो.
स्वभाव त्रिगुणात्मक असतो-सात्विक,राजसी व तामसी.बहुदा मन
राजसी वा तामसी भावनांना त्वरित प्रतिसाद देतं.सात्विक भावनात संयम
असतो तो मनाला पसंत नसतो.माणूस वारंवार राजसी व तामसी भावनांना
बळी पडतो.
सात्विक भाव उर्ध्वगामी असतात. ते माणसाला पूजनीय,वंदनीय बनव-
तात.राजसी भाव माणसाला क्रियाशील बनवतात.तामसीभाव माणसातल्या
आळशीवृत्तीला प्राधान्य देतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment