Sunday, 5 August 2018
Sunday, 10 June 2018
भावतरंग--:मनाचं नमन करणे हाच पुरुषार्थ
मनाची गुंतागुंत सहजा सहजी उकलत नाही. कधी ते आपल्या चुका प्रांजळपणे कबूल करतं तर कधी ह्या चुका नाहीतच म्हणून मल्लिनाथी करत बसतं. त्याचं अंतिम असं ठोस अभिमत नसतं. माणसाला सारखं दोन टोकात
झुलवत ठेवण्यात त्याला आनंद वाटतो. शेवटी स्वत:माझी हुकुमत शरीरावर चालते हेच त्याला हवं असतं. हुकूमतीचं
वेड हेच त्याचं ईप्सित असतं.
सभोवतालच्या लोकांना वाटतं हे असले वेडेचार का होताहेत. माणूस तर साधा सरळ पण त्याच्याकडून अशा उलट
सुलट कृती का व्हाव्यात?
मन बलवान असतं. इंद्रियांना आपल्या इच्छेनुसार नाचवण्यात त्याला और आनंद मिळतो. मन जिंकणं महा कठिण.
मनावर विजय म्हणजे स्वत:वर विजय. मन एकदा का हातात आलं की आनंदाचा अविरत स्त्रोत हाती यायला वेळ
लागत नाही. मनाचं चांचल्य हीच मनाची खासियत. चांचल्य हाच त्याचा स्वभाव.
जो मनाच्या आहारी जातो तोही असाच चांचल्याचा गुलाम बनतो. तो स्वतः चा राहातच नाही. स्वत्व त्याला नसतंच.
त्यामुळे त्याच्या अस्तित्वालाही अर्थ नसतो. मन हा माणसाचा विशेष. मन जिंकणं मनाचं अमन, नमन करणं हाच
पुरुषार्थ.

Saturday, 9 June 2018
भखवतरंग---लहरी मन वारंवार फसवतं.
लहरी मन वारंवार फसवतं. फसवणूक झाल्यानंतर लक्षात येतं की फसवणूक झाली. अगदी नकळत. प्रत्येक क्षणी अव्याहतपणे जागृत रहायला हवं. जागृतीत फसवणूक होण्याची शक्यता फारच कमी असते.
उठणं बसणं, खाणं पिणं, हिंडणं फिरणं, राहणं, हसणं हसवणं, सहेतुक वा अहेतुक, या सर्व
क्रिया मनाचं चांचल्य वाढवतात. निर्हेतुक असं काहीही घडत नसतं.
माणूस मात्र म्हणतो मला कळत नाही की हे असं कसं झालं?का झालं? ही शुद्ध फसवणूक असते. हेतु अप्रगट
असतो. त्याचं आकलन झालेलं नसतं. कारण मनाचा ढिलेपणा वा कृतीची यांत्रिकता.

Tuesday, 5 June 2018
भावतरंग---मन म्हणजे आठवणींचा पेटारा
मनातलं सारं सारं माणूस चार चौघात सांगत नाही. अनेक गोष्टी हृदयात असतात. चारचौघात बसल्यावर होणार्या गप्पा वरवरच्या असतात. बराचसा वेळ इतरांच्या वागणुकीची चिरफाड करण्यात जातो.
माणुस आहे तसा कधीच व्यक्त होत नाही. त्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू त्यालाच माहीत असतात. त्यामुळे मी ना त्याला
पूर्ण ओळखतो अशी विधाने खरी नसतात.
कुणीही कुणाला पूर्ण ओळखणं शक्य नसतं. क्षणोक्षणी बदलणारी परिस्थिती व वागणूक एक सारखी नसते. शिवाय वेगवेगळ्या अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानामुळे वागणुकीतही एक वाक्यता वाएकरसता नसते.
मन म्हणजे आठवणींचा पेटारा. या आठवणी बहुदा कटूच असतात. क्वचित सुखावह आठवणी मनाला हुरूप देतात.

Monday, 4 June 2018
मनस्तरंग व हृदयोर्मी माणसाला बेचैन करतात. अंतरंगातील भाव जेव्हा मनात प्रवेश करतात तेव्हा शरीरावर कृतीशील होतात. त्यांना हवीतशी कृती झाल्यावरच स्तब्धता अनुभवास येते. अन्यथा औदासिन्य वा तडफड माणसाला बेचैन करते. त्यातूनच अनेक भावभावना डोकावू लागतात. विचारांची एकच लाट उभी रहाते. सारंसारं घुसळून काढते ती. ही घुसळण
म्हणजेच भावोर्मींचा संघर्ष. भावभावनांचं युद्ध. त्यात प्रबल भावना बाजी मारते. अन्य सर्व भावना खदबदत रहातात.
निसर्गातही काळे कुट्ट ढग आकाशात गर्दी करतात. विजांचा कडकडाट होतो,ढगांचा गडगडाट होतो. वारा सून साय सूं
साय करीत असतो. टपोरे थेंब झरझर वेगाने पडतात. त्यानंतर कुठे सारं निवांत, शांत, स्तब्धता, नीरवता.

Saturday, 2 June 2018
भावतरंग--मनातला उद्वेग शांत करणारं लेणं.
थंड वारा, डुलणारं लुसलुशीत हिरवं ,गवत, डोलणारी झाडं, वेली,उमललेली फुले, निळं आकाश, थोडा वेळ दिसणारं इंद्र धनुष्य, पावसाच्या रिमझिम धारा थांबल्यावर स्वच्छ झालेले डांबरी रस्ते, आकाशातले मेघ, तारांवर बसलेली चिमणी पां-
खरं,निसर्गातलं हे सौंदर्य केवळ दिलखेचकच नव्हे तर आल्हाददायक असतं. डोळे ते सारं सारं टिपतात निरागसपणे. अं-
तर मनाची प्रतिक्रिया आनंददायी असते.
दूरवर दिसणारे निळे डोंगर, पहाटेचा वा संध्याकाळचा उगवता व मावळता सूर्य ,नदी व ओढ्यातून वाहणारे खळखळ आवाज करणारे पाणी, कोकिळेचं कूजन, चिमण्यांची चिवचिव, बासरीच्या मधुर ताना, गायक वा गायिकेच्या कंठातून
बाहेर पडणारे सुमधुर स्वर ,देवासमोर पेटवलेल्या उदबत्तीचा मंद धुंद करणारा सुगंध, कापराची ज्योत सारं सारं मन
मन मुग्ध करणारं मनातला उद्वेग शांत करणारं लेणं.

Thursday, 31 May 2018
मनात आठवणींचा साठा असतो. आंबट गोड आठवणी सारख्या साठवल्या जातात.स्मृती चित्रांची फिल्म सारखी फिरत असते. क्षणोक्षणी मनातील भावतरंग बदलत असतात. गत कालातील भयानक घटना मनासमोर येत राहतात.
घटना घडून गेलेल्या असतात. त्या घडता क्षणी ज्या अनुभूती अनुभवास आल्या त्यातील मधुर आठवणी मन वगळून
देतं व उद्वेगजनक संत्रस्त करणारे क्षण मात्र सारखे घोळत असतं. हा घोळ वाढतच जातो.

Tuesday, 29 May 2018
शब्द ही शह काट शह देतात-
मुसळधार पाऊस नुकसदायकअसतो. रस्त्याची दुरवस्था होते. पिकांची नासाडी होते. झाडे झुडपे उन्मळून पडतात. त्यातच विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट कानठळ्या बसवतो. पशुपक्षांची त्रेधा तिरपिट होते. पशूंची धावपळ.
सुरक्षित निवारा नसतो. सारं सारं अकल्पित व अघटित असतं. पाऊस धो धो कोसळतो. जुन्या मातीच्या घरांची पडझड
होते. कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. निसर्गाचं हे रौद्र रूप भयावह असतं.
क्रोधाचंही असंच असतं. क्रोध तापदायक असतो. डोळ्यातून अंगार व तोंडाद्वारे आरडणं ओरडणं. ऐकणार्याला ताप
व ऐकवणारा बेभान व बेफाम. बोलणं बेताल. चेहरा आकसलेला .हातवारे चमत्कारिक. कशाचाच धरबंध नसतो. प्रति -
पक्षही प्रत्युत्तर देणारा असला की मारपीट होण्याची शक्यता असते .
मुसळधार पावसामुळे नदी नाले सुसाट धावतात. तद्वत क्रोधामुळे शब्दधारांना वेगळी धार येते किनारा कापणार् या प्र-
व्हा प्रमाणेच शब्द ही शह काट शह देतात.

Saturday, 26 May 2018
अंतरंगाचा शोध
अंतरंगाचा शोध स्वतःलाच घेता येतो. बाहेरची कोणतीही शक्ती अंतरंगाला पाहू शकत नाही. अंतरंगातील खळबळ
खदबद फक्त ज्याची त्यालाच जाणवते.क्षणोक्षणी अंतरंगात उठणारी आवर्तने परिवर्तने फक्त ज्याची त्यालाच जाण-
वतात. शरीर मनाचा हा संबंध अनादि आहे. मनात उठणारे विचार, हृदयातील भावना व शरीरावयाद्वारे होणार्या प्र-
क्रिया यांचा अतूट संबंध असतो. हृदय, मन व मस्तकात काय चाललंय हे संपर्कात असलेल्या व्यक्तींना कळतंच असं
नाही. व्यक्ती आपापले तर्क करतात. यांच्या मनात हे चाललंय, ते चाललंय, हे विचार असतील, या भावभावना असती-
ल. हे तर्क खरे असतातच असे नाही. फक्त ते वरवरचे अंदाज असतात. त्यांचा माणसाच्या हृदय, मन व मस्तकशी
संबंध असतोच असे नसते.

Tuesday, 22 May 2018
प्रकृतीचं लेणं
रिमझिम पडणारा पाऊस आनंददायी असतो .अशा पावसात भिजण्यात आगळीवेगळी गोडी असते. शरीर पुलकित होतं.
रोम रोम खुलतं फुलतं. अंग अंग शहारतं .मनातली मरगळ संपते.नवनव्या ऊर्मी उत्तेजित करतात. आसमंतातील पशुपक्षी
घरेदारे, झाडे झुडपे सुस्नात होतात. सर्वत्र तालबद्ध स्वरनाद घुमतो . हे स्वर्गीय संगीत म्हणजेच सामगान. माती दगडातील अणु रेणु झंकृत होतो. मैदानातून नादवाही प्रवाह वेडी वाकडी वळणे घेत गतीशील होतात.नव चैतन्याची अनुभुती जड-
जी़वांना ही प्राकृतिक स्थिती अविस्मरणीय असते. प्रकृतीचं हे लेणं लावण्यमय असतं.

Tuesday, 15 May 2018
मी मी म्हणत म्हणत
मी मी म्हणत म्हणत
सारं आयुष्य जातं
कोण मी ?कुणाचा मी?
काही न कळता सारं संपतं
पै पै जोडून महाल उभा होतो
जोडा जोड करता करता
उपभोग राहून जातो
कुणाला न सांगता
जीव एकटाच निघून जातो
इथले सारे इथेच राहते
मित्रपरिवार,सगे सोयरे
स्मशानात पर्यंत सोबत करतात
अश्रू दोन ढाळून
मेलेल्याला विसरून जातात
सारं आयुष्य जातं
कोण मी ?कुणाचा मी?
काही न कळता सारं संपतं
पै पै जोडून महाल उभा होतो
जोडा जोड करता करता
उपभोग राहून जातो
कुणाला न सांगता
जीव एकटाच निघून जातो
इथले सारे इथेच राहते
मित्रपरिवार,सगे सोयरे
स्मशानात पर्यंत सोबत करतात
अश्रू दोन ढाळून
मेलेल्याला विसरून जातात
Thursday, 29 March 2018
भावतरंग---न्यूनगंड उद्गम व परिणाम
़़़ मनःशांतीसाठी अनेक बाह्य उपाय केले जातात.त्यामुळे तात्पुरती जुजबी शांती लाभल्याचा भासही होतो पंण प्रत्यक्षात मात्र तसं नसतं.जुजबी पापुद्रा केव्हा फाटतो ते कळतही नाही व मन सैरभैर धावतं.मनातील भाव तरंग हेलकावे घेतात.त्यांना नकारात्मक स्वरूपच आवडते की काय कुणास ठावूक त्यामुळे न्यूनगंड तयार व्हायला लागतो व एकदा का त्यानं ताबा घेतला की विमनस्कता,नैराश्य,आत्मग्लानी वाढू लागते.विचार चक्र गतिमान होतं.समु- द्रात एकदम लाटा उसळाव्यात तसे विचार उसळू लागतात.त्यांना आगा नसतो की पिच्छा नसतो.त्यांचं उग्र रूप क्षणोक्षणी वाढतच जातं त्यातून एकसुरीपणा, एककल्लीपणा वा एकलकोंडेपण जन्माला येते. जीवनातली उभारी संपते.आपल्या हातून काहीच घडणार नाही. अशी भावना वाढीला लागते.अपयशी हमखास होऊ असे वाटू लागते.एकदा का ही वावटळ उठली की ती थांबायचं नावच घेत नाही.विचारांच्या भाऊगर्दीमुळे निश्चय डळमळतो.बुद्धीमांद्य येतं.डोकं काम करेनासं होतं.माणूस दैववादी बनतो आपल्या नशिबाला दोष देतो. कुठलंच लक्ष्य समोर नसतं.दिशाहीन वाटचाल सुरु होते.स्व- प्नरंजन व स्वप्न भंजनाची शर्यत सुरु होते.स्वतःवरचा विश्वास उडतो.माणूस परिस्थितीला शरण जातो.पराक्रम व पुरुषार्थावरील त्याची श्रद्धा उडते व तो कापुरुष बनतो.सर्वत्र छिःथू होते. त्याचं त्याला सोयरसुतक नसतं.तो सारखं इतरांना कोसत असतो.़़़़़
Wednesday, 28 March 2018
आवडलेला विचार
तुमची मुले तुमची नाहीत.जीवनाच्या स्वतःच्याच उत्कट इच्छेची ती मुले आणि मुली आहेत.ती तुमच्यातून येतात पण तुमच्या पासून नाही आणि जरी ती तुमच्या बरोबर असली,
तरी तुमची नसतात.तुम्ही त्यांना तुमचे प्रेम देऊ शकता,पण विचार नाही.कारण त्यांचे स्वतःचे
विचार असतात.
खलील जिब्रान
Subscribe to:
Posts (Atom)