Friday, 31 March 2017

भावतरंग- मनाची कर्तूत

भावतरंग -मनाची कर्तूत निश्चय केव्हा ढळतो? स्खलन केव्हा होते?ते कळतही नाही.नकळत सारे घडून येते.घडल्यावर जाणवते.अरे! चुकले.निश्चय तर असा होता मग असे घडलेच कसे?ही सारी मनाची कर्तूत असते.-य मन केव्हा हुलकावणी देते ते कळत नाही.संयम केव्हा ढळला व इंद्रिय सुखाच्या आहारी आपण के्व्हा गेलो तेही कळत नाही. मनच संकल्प करायला लावतं व मनच त्या संकल्पाच्या विपरित इं- द्रियांना चेतवत .मोठी गंमत असते म्हणून प्रत्यही जागृत असायला हवं.जागृत रहाणं म्हणजे सुखरूप रहाणं होय. प्रत्येक क्षण नवा असतो परिवर्तनशील असतो.ती परिवर्तनशीलता पतनाकडे नेत नाही ना हे पाहाणं आपलं कर्तव्य होय.सतत उर्ध्वगमन व्हायला हवं.प्रगमन व्हायला हवं.पिछेहाट होता कामा नये. शब्द,स्पर्श,रूप,रस्,गंध या साऱ्या संवेदनांच्या बाबतीत सतर्क राह्यला हवं. विविध इंद्रियां द्वारे ह्या अनुभूती येत असतात.त्यातूनच चांगल्या वाईटाचं द्न्यान होत असतं.चांगल्याचा स्वीकार व वाईटाचं निर्मूलन हेच लक्ष्य असायला हवं त्यालाच सद्सद विवेक म्हटले जाते .आपली प्रत्येक कृती सत्या- ला धरून झाली तर जो निखळ आनंद मिळतो तोच परमात्मस्पर्श होय.तीच परमात्म प्राप्ती.त्यासाठीच सारी उठाठेव व्हायला हवी.त्यासाठीच अट्टाहास अन्यथा दुःसह असह्य स्थिती.

No comments:

Post a Comment