Sunday, 9 April 2017
भावतरंग-अन्तर्मनातील गुंतागुंत
भावतरंग-अन्तर्मनातील गुंतागुंत---
अन्तर्मनातील गुंतागुंत सहजा सहजी लक्षात येत नाही.कधी व कसा अनपेक्षित धक्का ते देते व गाडी मुळ रुळावरून धावू लागते ते कळेनासं
होतं.आपण ठरवतो एक.ठाम निश्चय करून काही काळ त्या प्रमाणे वर्तणुक
होते.इंद्रियांवर नियंत्रणअसतं.जागृतते मुळे ती विचलित होत नाहीत पण बेसा-
वध क्षणीअसं काही घडून येतं की केलेल्या निश्चयाच्या विपरित कृती घडून
जाते. व मग पश्चात्तापा शिवाय पर्याय नसतो.ही ससेहोलपट अचानक व अनपेक्षितपणे होत असते.त्याचा ताण असह्य होतो व विपरित कृती घडून
येते.मग स्वतःचा स्वतःवरचा ताबा जातो.राग येतो.स्वतःच्या दुबळ्या निश्चया-
ची जाणीव होते व मन गदगदतं.हताश व निराश. होतं.
अनेकदा असं घडतं.आश्चर्य वाटतं.अन्तर्मनाची अगाध शक्ती अना-
कलनीय असते.तिथं शांतता असल्याशिवाय जीवनात शांतीचा अनुभव येत
नाही.
सारी भौतिक सुख पायाशी लोळण घेत असतानाही अन्तर्मन व्य_
थित असतं.दुःखी असतं.क्रोधाविष्ट असतं.कधी कधी तर ते माणसाला आयु-ष्यातून उठवून लावतं. एकच क्षण बेसावधपणाचा माणसाला खातेऱ्यात ढक-
लतो. एकतर तो ठार वेडा तरी होतो वा आत्महत्या तरी करतो.निराश, हताश
होऊन जीवनातलं सौंदर्य गमावतो.स्वतः उध्वस्त होतो व इष्ट,मित्र व स्वकियांना
संत्रस्त करतो.
अन्तर्मन शुद्धी शिवाय खरी शुद्धी होत नाही.ते निर्मळ झाल्यावरच
खऱ्या आनंदाचास्रोत गवसतो.अन्यथा सारीच फसवणुक असते
Sunday, 2 April 2017
भावतरंग-व्यक्तीचं वर्तन त्याचं त्यालाच माहीत असतं
भावतरंग.व्यक्तीचं वर्तन त्याचं त्यालाच माहीत असतं.
मनाची मोठी गंमत आहे.एकाधी गोष्ट _घटना विसरायची म्हटल्यास ते जमत नाही.मन पुन्हा पुन्हा त्याच घटनेभोवती रुंजी घालतं.दुःखद घटना तर
अधिक त्रासदायक होते. झालेला अपमान,कुणी वापरलेले अपशब्द,केलेली
निंदा नालस्ती,नसता लावलेलं लांछन मन विसरायला तयार नसतं.घटना घडू-
न कितीही काळ उलटला तरी एकांतात तेच चित्र पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर
तरळून जातं.
जीवनातील सुखद क्षणांचा विसर पडतो.ते क्षण पुन्हा पुन्हा आठवण्या-
चा प्रयत्न करावा लागतो.
अनेकांशी वेगवेगळ्या संदर्भात आपला संबंध आलेला असतो.त्या त्या
व्यक्ती विषयी विशिष्ट प्रकारच्या प्रतिमा मनात तयार झालेल्या असतात.व्यक्ती
समोर आली की ती प्रतिमा समोर येते.अर्थात तेच त्या व्यक्तीचं खरं स्वरूप
असतं असं मानता कामा नये.कारण आपण फक्त त्याचं बाह्य निरीक्षण केलेलं
असतं.त्याच्या अंतरंगाचा ठाव आपण घेऊ शकत नाही.व्यक्तीचं वर्तन त्याचं
त्यालाच माहीत असतं.
अमुक एका परिस्थीतीत अमुक व्यक्ती अशीच का वागली याची कारणं
ज्याची त्यालाच कळतात.व्यक्तीचं वर्तन त्याच्या अंतरंगातील ऊर्मी,त्याचा
दृष्टीकोन,त्याच्या अंतस्थ भाव भावना,विचार संक्लपना यावर आधारित अस-
तात.हा गुंता उकलणं कठिण असतं.
कुणाच्याही वर्तणुकीचा पूर्व अंदाज खरा ठरतोच असे नसते....
Subscribe to:
Posts (Atom)