Thursday, 31 May 2018

   मनात आठवणींचा साठा असतो. आंबट गोड आठवणी सारख्या साठवल्या जातात.स्मृती चित्रांची फिल्म  सारखी फिरत असते.  क्षणोक्षणी मनातील भावतरंग बदलत असतात. गत कालातील भयानक घटना मनासमोर येत राहतात.
घटना घडून गेलेल्या असतात. त्या घडता क्षणी  ज्या अनुभूती अनुभवास आल्या त्यातील मधुर आठवणी मन वगळून
देतं व उद्वेगजनक संत्रस्त करणारे क्षण मात्र सारखे घोळत असतं. हा घोळ वाढतच जातो.
                                               
                                                           

Tuesday, 29 May 2018

शब्द ही शह काट शह देतात-

मुसळधार पाऊस नुकसदायकअसतो. रस्त्याची दुरवस्था  होते. पिकांची नासाडी होते. झाडे झुडपे उन्मळून पडतात. त्यातच विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट कानठळ्या बसवतो. पशुपक्षांची त्रेधा तिरपिट होते. पशूंची धावपळ.
 सुरक्षित निवारा नसतो. सारं सारं अकल्पित व अघटित असतं. पाऊस धो धो कोसळतो. जुन्या मातीच्या घरांची पडझड
होते. कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. निसर्गाचं हे  रौद्र रूप भयावह असतं.
क्रोधाचंही  असंच असतं. क्रोध तापदायक असतो. डोळ्यातून अंगार व तोंडाद्वारे आरडणं ओरडणं. ऐकणार्‍याला ताप
व ऐकवणारा बेभान व बेफाम. बोलणं बेताल. चेहरा आकसलेला .हातवारे चमत्कारिक. कशाचाच धरबंध नसतो. प्रति -
पक्षही प्रत्युत्तर देणारा असला की मारपीट होण्याची शक्यता असते .
मुसळधार पावसामुळे नदी नाले सुसाट धावतात. तद्वत क्रोधामुळे शब्दधारांना वेगळी धार येते किनारा कापणार् या प्र-
व्हा प्रमाणेच शब्द ही शह काट शह देतात. 

Saturday, 26 May 2018

अंतरंगाचा शोध

अंतरंगाचा शोध स्वतःलाच घेता येतो. बाहेरची कोणतीही शक्ती अंतरंगाला पाहू शकत नाही. अंतरंगातील खळबळ
खदबद फक्त ज्याची त्यालाच जाणवते.क्षणोक्षणी अंतरंगात उठणारी आवर्तने परिवर्तने फक्त ज्याची त्यालाच जाण-
वतात. शरीर मनाचा हा संबंध अनादि आहे. मनात उठणारे विचार, हृदयातील भावना व शरीरावयाद्वारे होणार्‍या प्र-
क्रिया यांचा अतूट संबंध असतो. हृदय, मन व मस्तकात काय चाललंय हे संपर्कात असलेल्या व्यक्तींना कळतंच असं
नाही. व्यक्ती आपापले तर्क करतात. यांच्या मनात हे चाललंय, ते चाललंय, हे विचार असतील, या भावभावना असती-
ल. हे तर्क खरे असतातच असे नाही. फक्त  ते वरवरचे अंदाज असतात. त्यांचा माणसाच्या हृदय, मन व मस्तकशी
संबंध असतोच  असे नसते. 

Tuesday, 22 May 2018

प्रकृतीचं लेणं

रिमझिम पडणारा पाऊस आनंददायी असतो .अशा पावसात भिजण्यात आगळीवेगळी गोडी असते. शरीर पुलकित होतं.
रोम रोम खुलतं फुलतं. अंग अंग शहारतं .मनातली मरगळ संपते.नवनव्या ऊर्मी उत्तेजित करतात. आसमंतातील पशुपक्षी
घरेदारे, झाडे झुडपे सुस्नात होतात. सर्वत्र तालबद्ध स्वरनाद घुमतो . हे स्वर्गीय संगीत म्हणजेच सामगान. माती दगडातील अणु रेणु झंकृत होतो. मैदानातून नादवाही प्रवाह वेडी वाकडी वळणे घेत गतीशील होतात.नव चैतन्याची अनुभुती जड-
जी़वांना ही प्राकृतिक स्थिती अविस्मरणीय असते. प्रकृतीचं हे लेणं लावण्यमय असतं. 




Tuesday, 15 May 2018

मी मी म्हणत म्हणत

मी मी म्हणत म्हणत
सारं आयुष्य जातं
कोण मी ?कुणाचा मी?
काही न कळता सारं संपतं
                                 
पै पै जोडून महाल उभा होतो
जोडा जोड करता करता
उपभोग राहून जातो
कुणाला न सांगता
जीव एकटाच निघून जातो

इथले सारे इथेच राहते
मित्रपरिवार,सगे सोयरे
 स्मशानात पर्यंत सोबत करतात
अश्रू दोन ढाळून
मेलेल्याला विसरून जातात