Thursday, 16 March 2017

अंतर्नाद-स्वभाव स्वतःलाच कळतो-

स्वभाव स्वतःलाच कळतो.तो कप्पा इतरांना अद्न्यात असतो.अन्तर्मनातली खदबद स्वतःलाच जाणवते.इतरांना ती दिसत नसते. अन्तर्मनातले भाव लपवण्याचं कौशल्य फक्त मानव प्राण्यात असतं.आपले भाव सर्वच्या सर्व जसेच्या तसे जर माणूस प्रकट करील तर त्याचं स्वार्थी रूप जगाला दिसून येईल व त्याची कवडी किंमत होईल. द्वेष,ईर्ष्या,क्रोध,लोभ सारं सारं माणसाला लपवता येतं.तो जसा असतो तसा क्वचितच दृष्टीगत होतो.त्याचं बाह्य रूप तो अधिकाधिक आकर्षक व प्रभावी ठेवण्याचा प्रयत्न करतो.त्याचं बोलणं,चालणं,उठणं,बसणं कृत्रिम असतं.मनात असतं ते तो बोलतोच असं नाही.आपलं खरं स्वरूप तो लपवित असतो.वैभव, संपत्ती,समृद्धी,घरदार,बंगला,गाडी मिळवण्यासाठी,वैभव प्रतिष्ठा प्राप्ती साठी त्याची धडपड असते.त्यासाठी नको तिथं समझोता असतो.नकोते मार्ग तो अवलंबतो.परंतू अन्तर्मन तो एकटा असतो तेव्हाआतून टोचणी देत.गाडी, बंगला वैभव कसं मिळालं हे जर तो खरं खरं सांगू लागला तर त्याची नाचक्कीच होईल सारं काही वाम मार्गाने मिळावावं लागलं याची त्याला जाणीव होते. वैभव प्रतिष्ठा मिळवूनही तो संतुष्ट नसतो.मन आतून धक्के देत असतं त्याची भर्त्सना करीत असतं.ती टोचणी भयंकर असते ती टोचणी कमी व्हावी म्हणून तो व्यसनाधीन होतो.त्याचं स्वतःचं क्रौर्य,चौर्य जगा पासून लपवता लपवता तो दुहेरी जीवन जगू लागतो.शेवटी आप्तेष्ट,सगे संबंधी,मित्र परीवार साऱ्यां-पासून तो दुरावतो.

No comments:

Post a Comment