थंड वारा, डुलणारं लुसलुशीत हिरवं ,गवत, डोलणारी झाडं, वेली,उमललेली फुले, निळं आकाश, थोडा वेळ दिसणारं इंद्र धनुष्य, पावसाच्या रिमझिम धारा थांबल्यावर स्वच्छ झालेले डांबरी रस्ते, आकाशातले मेघ, तारांवर बसलेली चिमणी पां-
खरं,निसर्गातलं हे सौंदर्य केवळ दिलखेचकच नव्हे तर आल्हाददायक असतं. डोळे ते सारं सारं टिपतात निरागसपणे. अं-
तर मनाची प्रतिक्रिया आनंददायी असते.
दूरवर दिसणारे निळे डोंगर, पहाटेचा वा संध्याकाळचा उगवता व मावळता सूर्य ,नदी व ओढ्यातून वाहणारे खळखळ आवाज करणारे पाणी, कोकिळेचं कूजन, चिमण्यांची चिवचिव, बासरीच्या मधुर ताना, गायक वा गायिकेच्या कंठातून
बाहेर पडणारे सुमधुर स्वर ,देवासमोर पेटवलेल्या उदबत्तीचा मंद धुंद करणारा सुगंध, कापराची ज्योत सारं सारं मन
मन मुग्ध करणारं मनातला उद्वेग शांत करणारं लेणं.

No comments:
Post a Comment