Sunday, 10 June 2018

भावतरंग--:मनाचं नमन करणे हाच पुरुषार्थ

   मनाची गुंतागुंत सहजा सहजी उकलत नाही. कधी  ते आपल्या चुका प्रांजळपणे कबूल करतं तर कधी ह्या चुका नाहीतच म्हणून मल्लिनाथी करत बसतं. त्याचं अंतिम असं ठोस अभिमत नसतं. माणसाला सारखं दोन टोकात
झुलवत ठेवण्यात त्याला आनंद वाटतो. शेवटी स्वत:माझी हुकुमत शरीरावर चालते हेच त्याला हवं असतं. हुकूमतीचं
वेड हेच त्याचं ईप्सित असतं.
    सभोवतालच्या लोकांना वाटतं हे असले वेडेचार का होताहेत. माणूस तर साधा सरळ पण त्याच्याकडून अशा उलट
सुलट कृती का व्हाव्यात?
     मन बलवान असतं. इंद्रियांना आपल्या इच्छेनुसार नाचवण्यात त्याला और आनंद मिळतो. मन जिंकणं महा कठिण.
मनावर विजय म्हणजे स्वत:वर विजय. मन एकदा का हातात आलं की आनंदाचा अविरत स्त्रोत हाती यायला वेळ
लागत नाही. मनाचं चांचल्य हीच मनाची खासियत. चांचल्य हाच त्याचा स्वभाव.
   जो मनाच्या आहारी जातो तोही असाच चांचल्याचा गुलाम बनतो. तो स्वतः चा राहातच नाही. स्वत्व त्याला नसतंच.
त्यामुळे त्याच्या अस्तित्वालाही अर्थ नसतो. मन  हा माणसाचा विशेष. मन जिंकणं मनाचं अमन, नमन करणं हाच
पुरुषार्थ. 

No comments:

Post a Comment