Tuesday, 5 June 2018

भावतरंग---मन म्हणजे आठवणींचा पेटारा

    मनातलं सारं सारं माणूस चार चौघात सांगत नाही. अनेक गोष्टी हृदयात असतात. चारचौघात बसल्यावर होणार्‍या गप्पा वरवरच्या असतात. बराचसा वेळ इतरांच्या वागणुकीची चिरफाड करण्यात जातो.
     माणुस आहे तसा कधीच व्यक्त होत नाही. त्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू त्यालाच माहीत असतात. त्यामुळे मी ना त्याला
पूर्ण ओळखतो अशी विधाने खरी नसतात.
      कुणीही कुणाला पूर्ण ओळखणं शक्य नसतं. क्षणोक्षणी बदलणारी परिस्थिती व वागणूक एक  सारखी नसते. शिवाय वेगवेगळ्या अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानामुळे वागणुकीतही एक वाक्यता वाएकरसता नसते.
    मन म्हणजे आठवणींचा पेटारा. या आठवणी बहुदा कटूच असतात. क्वचित सुखावह आठवणी मनाला हुरूप देतात. 

No comments:

Post a Comment