Saturday, 28 May 2016

तो सतत हसत असतो

                       
तो सतत हसत असतो.हसता हसता व्यथा साऱ्या डोळ्यातून सांगत असतो.त्याचं हसणं कळत नकळत  खूप दिलासा देऊन जातं.हृदतंत्रीची हरेक तार हलकेच छेडून जातं. असं हसणं खोलखोल अंतरात घुसणारं,
घुसमटल्या मनाला किंचित धीर देणारं, बावनकशी हसणं त्याचं,स्वतःला जाळणारं,अग्निदिव्य करून नवं रूप घेणारं
                                                                 
   किलकिल्या डोळ्यांनी आईकडे पाहिलं.खुदकन हसला तो.साऱ्या वेदना सारी दुःखं,अनंत यातना,वैधव्य,
सारं सारं हलकं झालं.स्वतःला,दुःखाला विसरायचं अदभुत औषध हसण्यात त्याच्या तिला मिळालं.

 चेंडूसाठी खूपखूप रडला तो.रड रडून झोपला निपचित.तिनं कुठून चिंध्या आणून रंगीत चेंडू शिवला.शिवता
शिवता सुईनं डंख तिला मारला.रक्ताचा लाल डाग चिंधीला लागला.चेंडू हातात येताच बाळ खुदकन हसला.
आईच्या डोळ्यात भाव नवा तरळला.रक्ताच्या थेंबातून आनंदाची कारंजी थुई थुई उडत राहिली. चेंडूची कथा
स्वतःची व्यथा मायेच्या पेटाऱ्यात अजूनही बंदआहे. तो मात्र हसतोय लबाड कुठला.चेंडूचा लाल रंग त्याला
खूप आवडतो.पुनःपुन्हा मागे त्याच्या धावत जातो.धावता धावता धडपडतो,पडतो,खरचटतं.हसणं मात्र
अव्याहत आईला हसवत."वेडी कुठली.चेंडूला रक्ताचा रंग लागला तरी हसते म्हणूनसारे हसतात तिला कुत्सित
पणे खुळी म्हऩून.हसणाऱ्याचे दात दिसतात मला कायम्हणून ती चुप बसते.मिश्किलपणे डोळ्यातल्या  डोळ्यातखुदकन हसते.भविष्याची सुंदर सुंदर स्वप्ने  पाहात बसते.

 पहिला पगार हातावर आईच्या देऊन तो हसला. आशीर्वाद घेण्यासाठी माथा त्याचाझुकला.कृतकृत्य झाली
ती़सारखी पाहात राहिली.तपस्येला आलेलं फळ पाहून भिंतीवरली तसवीर हसली.डोळ्यातून तिच्या मात्र
पटपट मोत्ये ओघळली.
  "हे काय,कोणतं दुःख तुला,सांग मला" गलबलून बोलला तो."हत् वेड्या"म्हणून ती हलकेच हसली.तसविरी
कडे पाहून नजर तिची झुकली."हे सुख पाहायला ते राहायला हवे होते हवे होते,ते हवे होते.एवढीच  उणीव
राहिली.हाय भाग्य"म्हणून ती हताशपणे हसली.

  ऑफिसात दुरुन दुरुन दोन डोळे हसले.हसता हसता हृदयात खोलखोल शिरले.गोड गोड संवेदना ते देऊन
गेले.आजवर असं हसणं त्यानं.पाह्यलं नव्हतं.हसण्यात तो वाहून गेला.स्वतःला विसरून गेला. खळाळणाऱ्या
सरितेच्या धारेत तो डुंबून गेला.चंद्राचं,ताऱ्यांचं,फुलांचं सर्वांच्या हसण्याहून तिचं हसणं सरस,  गुदगुल्या
करणारं ,अननुभूत जगात वेगानं नेणारं .ज्या हसण्याला  जोड नाही,त्या हसण्याचं वेड त्याला लागलं.

 तेव्हापासून चांदण्यात,नदीकाठी,बागेत कुठल्याशा झाडाखाली,एकांतात दोघेही हसत असतात.हसता
हसता बंधनात हलके हलके बांधले जातात.वेडे,खुळे म्हणून जग हसत असते.त्या हसण्याची या दोघांना
पर्वा नसते.उलट हसणाऱ्यांना चिडवण्यासाठी छद्मी हास्य लेवून दोघेही खदखदून हसतात.त्याच्या लीला
पाहून झाडावरचे पक्षी किलबिल किलबिल करतात."वाsखूब, बहोत अच्छा,आगे बढो_म्हणून ते दाद
देतात

कोण ते? तो का.?तुझ्याच ऑफिसातला ?सांगना?उं?इतके का आढेेवेढे?जसंकाही आम्हाला दिसत नाही
मेलं?ऐकायला येतं कुठे?अं?तिथं तिकडं चांदण्यात,तलावात,कोणती जम्माडी जम्मत? सांगत् खरं.

सारं सारं ती ऐकत असते."छट् काही तरीच.उगीच का चिडवता?तसं काहीच नाहीये."

असं होय -कुणीतरी म्हणतं.
"काल त्यालाअपघात झाला इकडे येताना.स्कूटरवरुन पडला तो.बेशुद्ध झाला इस्पितळात नेल्यावरऔषधोपचार केला.डोळे उघडताच तो काय म्हणाला ऐकायचंय?" मिश्किलपणे
हसून छटेल ती बोलली.

"छट काहीतरीच काहीच्या बाही सांगतेस तू.काल तर तो न् मी दोघेही अजिंठ्यात होतो."'

 "आता कसं?" "अजिंठ्यात तुम्ही दोघं? ऐकागं.अजिंठ्याची पारो ही.गिल साठी बेताब."
"चुप" "वाsगं" 'बोलायची का बंदी?" म्हणून भोवतीची फुलं खुदकन हसली. हसता हसता
सर्वांची मुरकुंडी वळली.

"लबाड कुठली.जसं काही तुझं गुपित तुलाच माहित आहे.आम्ही त्या गावच्याच नाही
असं का समजतेस?" म्हणून गळ्यात तिच्या कुणीतरी हलकेच हात घातला.डोळ्यात
खोलखोल डोकाऊन ती बोलली."हिलाही दवाखान्यात न्यायला हवं.भारी बाई भया-
नक रोग हा".
"कोणता ग?"
"छट् आम्ही नाही जा."
"सांगा ना,सांगा ना" खूप तिनं विनवलं.हसता हसता सर्वांनी गुपित तिचं फोडलं..
"प्रेमरोग म्हणतात याला" ऐकताच ती लाजली.लाजून लाजून धूम कुठे दूरवर
.पळाली.पळता पळता खदखदून स्वतःशीच हसली. हसता हसता हृदयातील
हजार रंग उधळुन गेली.भोवतीची फुलं घेर धरुन फेरधरुन धुंद होऊन नाचली.

  आज तो खुष होता.त्याचा वाढ दिवस होता.आईनं त्याच्यासाठी निरांजन लावलं
होतं. खूपखूप मजा आली.यार दोस्त सर्व आले.तरी तो खि न्न होता.दाराकडे
 सारखं एकटक पाहात होता.गीत संगीत नृत्य कशात त्याचं चित्त नव्हतं.
 तोच मुड बदलला.कळी त्याची खुलली. नजरानजर झाली.फुलांची ओंजळ
हलकेच तिनं त्याच्या हातात ठेवली.मोजून पंचवीस फुलं धुंद वासाची.चेहरा
त्याचा उजळला.वेगळीच चमक आली.हृदयोर्मी उफाणल्या.तिकडे डिस्को
सुरु झाला.याचे पाय फुरफुरले.ती ही थिरकली.बेफाम होऊन बेभान होऊन
दोघेही नाचले नाचता नाचता पडली ती.बेहोष. रंगाचा भंग झाला.सर्वांची
धावपळ. धावत जाऊन डॉक्टरना तो घेऊन आला.आई समजायचं ते समजली.
ओठातल्या ओठात हसली."ठीक आहे. थोड्या वेळात बरं वाटेल. घाबरायचं
कारण नाही.अत्यानंदाच्या स्थितीत होतं असं कधी कधी".
"डॉक्टर.?".
"बिलकुल घाबरु नका"
तिनंडोळे  उघडले.भिरभिरत्या नजरेनं घ्यायचा शोध  घेतला.दूरदूर उभा तो.
उशीशी आई त्याची."हं बाळ.बरं वाटतंयना? उठून बसायची घाई नको.शांत
तू पडून राहा.घरी निरोप पाठवलाय.अन् आता यापुढे हेच घर तुझं होईल.
चालेलना?
इश्श काहीतरीच म्हणून ती लाजली.तिचं लाजणं पाहून त्याची आईउठली
"मी जरा चहा टाकते"म्हणून आतगेली.जाता जाता एकदा मागे वळून पाह्यलं
.कौतुकानं हसली ती.त्याला तेच हवं होतं.धावत धावत तो जवळ गेला.
झाडाला वेल लपेटली.तिकडे आईच्या हातातून बशीखाली पडली.
"मला मेलीला होत नाही.भार कुणीतरी घ्यायला हवा.म्हणजे मी सुटले_"
म्हणत ती आत आली.
"ऊठ ग.जा तू.आईला मदत कर". "असं होय" अंगठा दाखवून ती आत गेली.
आईची मुलाची दिलखुलास चर्चा झाली.
रीतसर वरणी.आठ दिवसात लग्न. धामधुम.आईच्या चेहऱ्यावर आगळं स्मित
झळकलं.
























































































































































.









.
...























.








..





















No comments:

Post a Comment